रामदास ठूसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
रविवार दिनांक २३/०६/२०२४ रोजी सुधाकर अडबाले शिक्षक आमदार नागपूर विभाग यांचे अध्यक्षतेखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर मधील अनुदानित आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची संयुक्त सभा सुधाकर अडबाले यांच्या जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर येथील घरच्या सभागृहात घेण्यात आली.
सभेत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ सलग्न चंद्रपूर जिल्ह्यातील अनुदानित/शासकीय आश्रमशाळा कार्यकारणी गठीत करण्यात आली. कार्यकारिणीच्या प्रमुख मार्गदर्शक पदी आमदार सुधाकर अडबाले सर यांची निवड करण्यात आली तर अध्यक्ष म्हणून प्रमोद साळवे माध्यमिक शिक्षक आश्रमशाळा किरमिरी यांची सर्वानुमते निवड केली.
कार्यकारणीचे उपाध्यक्ष म्हणून अरविंद राऊत आश्रमशाळा सरडपार, शंकरराव लोनगाडगे माध्यमिक शिक्षक आश्रमशाळा गोंडपिपरी, प्रभाकर वडस्कर आश्रमशाळा टेकामांडवा, सुरेश वरारकर आश्रमशाळा कोदेपूर या चार शिक्षकांची निवड केली आहे.
सचिव व कार्यवाह म्हणून मनोज आत्राम तर सहसचिव सुदर्शन गाडगे, गजानन वादाफळे,कु. सुशिला झिलपे, माणिकचंद ताडाम या चार कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. कोषाध्यक्ष महेश ताजने तर कार्याध्यक्ष चंद्रभान वरारकर, सल्लागार म्हणून संतोष केशेट्टीवार, प्रसिद्धीप्रमुख अमित देहारकर यांची निवड केली आहे.
कार्यकारिणीचे सदस्य म्हणून किशोर पिंपळशेंडे, सौ. भारती शेंडे, बजरंग जेणेकर, सचिन कसारे, दादाजी गद्देकार, विलास सुदरी, गोपाळ बोबाटे, युवराज मेश्राम, दादाजी आडकिने, रुपेश निमसडे, अनुप मोहितकर इत्यादी आश्रमशाळा शिक्षक कर्मचारी यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारणी गठीत झाल्यानंतर सदर सभेमध्ये आमदार सुधाकर अडबाले यांचे सोबत अनेक समस्याबाबत चर्चा करण्यात आली जसे एकस्तर पदोन्नतीची (४८०० ग्रेट पे) वेतन निश्चिती करणे, वैद्यकीय देयकाबाबत, अर्जित रजा रोखीकरण, प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे, दहावी-बारावीचा कमी निकाल लागलेल्या शिक्षकावर कारवाई होऊ नये याबाबत, काम नाही वेतन नाही याबाबत, पहारेकरी/चौकीदार यांच्या मान्यतेबाबत इत्यादी विषयावर चर्चा होऊन पुढे प्रकल्प अधिकारी चंद्रपूर यांचेकडे होणाऱ्या समस्या निवारण सभेमध्ये आश्रमशाळा कर्मचारी यांच्या समस्यांचे निवारण झाले पाहिजे असे सभेमध्ये ठरले.सभेला बहुसंख्य आश्रमशाळा कर्मचारी उपस्थित होते.