मालेवाडा येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी..

       रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

         चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार,मालेवाडा येथे दि.26 जून रोजी सकाळी ठीक 10 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

       छत्रपती शाहूमहाराज यांचे प्रतिमेला बौध्द पंच कमेटी,मालेवाडाचे अध्यक्ष आयु. जगदीश आनंदराव रामटेके यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.

       याप्रसंगी आयु.जगदीश रामटेके,गौतम खोब्रागडे यांनी “छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य” या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन करून अभिवादन केले.  

        याप्रसंगी गंगाधर गजभिये,राजेंद्र गजभिये, दिनेश गजभिये , शकुंतला मेश्राम, मिलन मेश्राम व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , आभार प्रदीप मेश्राम यांनी केले.