अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी आळंदी सिद्धबेट बंधाऱ्याला दिली भेट…. — पिंपरी-चिंचवड महापालिकेसह या नदीलगतच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटीसा बजावल्या…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : आळंदीतील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न विविध प्रसारमाध्यमांनी उचलून धरल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेसह या नदीलगतच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटीसा बजावल्या आहेत.

          या पार्श्वभूमीवरअतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी मंगळवारी (दि.25) आळंदी सिद्धबेट बंधारा येथे भेट देत, इंद्रायणी नदीपात्राची पाहणी केली. नदीतील जलपर्णी काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून तेथील अनुषंगिक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

          आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पिंपरी चिंचवड शहरातून जाणार आहे. या पालखी मार्गाची पाहणी करताना अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी सिद्धबेट बंधार्‍याजवळ फेसाळणार्‍या इंद्रायणी नदीपात्राची पाहणी केली. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, बाबासाहेब गलबले, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, हरविंदरसिंग बन्सल, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.