आज शाहू महाराज जयंती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन…

ऋग्वेद येवले

 उपसंपादक

दखल न्युज भारत

          साकोली -प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोलीच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती एकोडी रोड साकोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

          या कार्यक्रमाचे उद्घाटक निलेश कदम साहेब तहसीलदार साकोली, अध्यक्ष मदनभाऊ रामटेके समाजकल्याण सभापती भंडारा,प्रमुख उपस्थिती रमाकांत कोकाटे पोलीस निरीक्षक साकोली, सचिन आगरकर आगार प्रमुख साकोली, सभापती गणेश आदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.संदीप गजभिये ,परमानंद मेश्राम सामाजिक नेते, दीपक साखरे अध्यक्ष स्मारक समिती, बेलखोडे साहेब आर एफ ओ सामाजिक वनीकरण, किशोर चन्ने सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ रंगकर्मी भूमाला उईके,प्रबोधनकार मनोज कोटांगले, जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले,महासचिव राकेश वालदे, गोरेगाव अध्यक्ष नितीन साखरे,संजय टेंभुर्णे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष मानवाधिकार यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.

         या निमित्ताने रस्क्तदान व संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.

           तरी परिसरातील सर्वानी रक्तदान करावे असे आव्हान जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले तालुका अध्यक्ष मनोज बोपचे, उपाध्यक्ष संजय टेंभुर्णे महासचिव ईश्वर धकाते, सचिव यशवन्त बागडे, धनंजय धकाते, उमेश भोयर, संदीप कोटांगले , रोहित मांढरे, सोनू मेश्राम, गुड्डू बोरकर,विनोद मुरकुटे, अरविंद कांबळे,पितांबर सूर्यवंशी,संदीप नागदेवे,प्रल्हाद भुजाडे, अरविंद शिवणकर, पुण्यशील कोचे यांनी केले.