आरक्षणाचे जनक,राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन!..

         150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या लोकशाही मूल्यांचा प्रतिकूल परिस्थितीत अविष्कार करण्याच्या क्रांतीला विनम्र अभिवादन.!

       जेंव्हा छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात आपल्या राज्यात केली. तेंव्हा सनातनी ब्राम्हणांचे शिष्टमंडळ या आरक्षणाला विरोध करण्यासाठी म्हणून शाहू महाराजांना भेटण्यास आले.तेंव्हा त्या शिष्टमंडळा काहीही एकही शब्द न बोलता त्यांना आपल्या तळमजल्यातील घोड्याच्या तबेल्यात घेऊन गेले. त्या शिष्टमंडळासमोर त्यांनी नोकरदाराला एका मोठ्या भांड्यात तबेल्याच्या मधोमध घोड्याचा खुराक (घोड्याचे खाद्यपदार्थ) टाकायला सांगितले. त्यानंतर त्या नोकराला आदेश दिला की, आता सर्व घोड्याना मोकळे कर. आणि मग काय झालं.!

          तर त्या सर्व घोड्यामध्ये जे सर्वात बलवान आणि सशक्त होते ते त्या खाद्यपदार्थावर तुटून पडले,अवघ्या काही वेळातच त्यांनी ते खाद्यपदार्थ फस्त केले. जे थोडेसे कमजोर होते त्यांना व जे सर्वात लहान आणि अशक्त होते त्यांच्या वाट्याला तर काहीही आले नाही.

        जेंव्हा खाद्यपदार्थ संपले तेंव्हा सर्व घोडे अपापल्या दावणीला जाऊन बसले. ही घटना बघितल्यानंतर आरक्षणाचा विरोध करणाऱ्या मंडळीच्या तोंडातून शब्दही निघेना. गुमान त्या शिष्टमंडळाने तिथून काढता पाय घेतला..!!!”

      असे रयतेचे खरे राजे होते, जे छत्रपती. शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून शोभून दिसतात.

      म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,”एक वेळ माझा जन्मदिवस साजरा करू नका.मात्र आपल्या छत्रपती शाहू महाराजांची जयंती एका सणाप्रमाणे साजरी करा.”

      म्हणून अशा क्रांतिकारी लोकराजास अनंत भवरे आणि परिवारातर्फे तसेच ग्रुपतर्फे एकंदरीत आपल्या सर्वांतर्फे त्रिवार अभिवादन!

           अभिवादनकर्ता           

            अनंत केरबाजी भवरे 

संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689 

***

      “दखल न्यूज भारत परिवार सुध्दा,”आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांना,मनःपुर्वक अभिवादन करतो आहे….‌