नालीच्या वादातून खल्लार येथे दोन गटात मारामारी, परस्परविरोधी पोलिसात तक्रार, दोन्ही गटातील 9 जणांविरुध्द गुन्हे दाखल…

 

युवराज डोंगरे/खल्लार 

       उपसंपादक

         नालीच्या व जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी होऊन दोन्ही गटांनी परस्परविरोधी खल्लार पोलिसात तक्रार दाखल केली असून खल्लार पोलिसांनी दोन्ही गटातील 9 जणांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.

       खल्लार येथील दिगांबर गणेश डिके व गजानन रामराव डिके या दोघांचेही कुटुंब घराशेजारी वास्तव्यास आहे. दोन्ही कुटूंबात जागेचा जुना वाद सुरु आहे. या वादातून त्यांचे नेहमीच खटके उडून वाद निर्माण होत होता.

      दि 25 जुनला दुपारी 3 ते 3:30 वाजताच्या सुमारास नालीच्या कारणावरुन वाद झाला त्याच वादातून राजु रामराव डिके, गजानन रामराव डिके, सोमेश गजानन डिके, अस्मिता गजानन डिके, अंजु राजू डिके यांनी दिगांबर डिके, सुभाष डिके, पवन डिके, निखिल डिके यांना लोखंडी,धारदार शस्त्राने मारहाण करुन जखमी केले.फिर्यादी पवन दिगांबर डिके याने दिलेल्या तक्रारीवरुन खल्लार पोलिसांनी आरोपी राजु रामराव डिके,गजानन रामराव डिके, सोमेश गजानन डिके, अस्मिता गजानन डिके, अंजु राजू डिके यांच्याविरुध्द अप न 154/23, कलम 141,142,143,148,149,326,504,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

        तर दुसरीकडे नाली वादातून मारहाण केल्याप्रकरणी फिर्यादी गजानन रामराव डिके यांच्या तक्रारीवरुन आरोपी दिगांबर डिके, पवन दिगांबर डिके, निखिल सुभाष डिके, सुभाष गणेश डिके यांच्याविरुध्द अप न 155/23, कलम 324,504,34 नुसार गुन्हा दाखल केला असून या दोन्ही घटनेचा तपास ठाणेदार चंद्रकला मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली खल्लार पोलिस करीत आहेत.