चिपळूण (ओंकार रेळेकर)

  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना खरी मदतीची गरज असते. माझी मातृभूमी असलेल्या या अडरे-वेहेळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे, या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी येथे केले. साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, वेहेळे ग्रामपंचायतीचे सदस्य रोहित गमरे, सामाजिक कार्यकर्ते उदय भोजने, भिम संघर्ष क्रीडा मंडळ वेहेळे यांच्या वतीने अडरे येथील पी.के. सावंत माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन अडरे हायस्कूल येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

या कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा इंदुलकर या अध्यक्षस्थानी होत्या. विचारपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संदेश पवार, सामाजिक कार्यकर्ते उदय भोजने, ग्रा. प. सदस्य व क्रिडा प्रशिक्षक रोहित गमरे, विद्यालयातील शिक्षक दत्ताराम निर्मळ, जयप्रकाश खेडेकर, देविदास शिंदे, श्रीमती राजेशिर्के, सौ. जानवलकर, सौ. जाबरे यांच्यासह इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सुहास राजेशिर्के पुढे म्हणाले, अडरे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे, मुंबई पुण्यातील तज्ञ मार्गदर्शकांना येथे बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावयाचे आहे. विद्यार्थ्यांना दहावी-बारावी नंतर पुढे काय? असा प्रश्न असतो, त्यासाठी सुयोग्य मार्गदर्शन दिले जाणार आहे. गोरगरीब, सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यावर आपला भर राहील असे सांगितले. तसेच यावेळी पत्रकार संदेश पवार यांनी मार्गदर्शन करताना प्रथमतः शाळेचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी नव्याने नियुक्ती झाल्याबद्दल सुषमा इंदुलकर यांचा भिम संघर्ष क्रीडा मंडळ वेहेळे यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला

ते म्हणाले सुहास राजेशिर्के यांनी सातारा येथे अतिशय प्रभावीपणे काम केले आहे. त्याचप्रमाणे आपल्या मायभूमीत देखील काम करण्याचा त्यांचा मनोदय पंचक्रोशीतील नागरिकांसाठी प्रेरणादायी असा आहे. त्यांची ही तळमळ सर्वांना उभारी देणारी आहे असे सांगितले. तर अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका सुषमा इंदुलकर यांनी आपल्या विद्यालयाने केलेल्या कामगिरीची माहिती दिली. आपण बिकट परिस्थितीतून वाटचाल करीत असताना विद्यार्थ्यांनी मिळवलेले सुयश हे निश्चितच सर्वांना समाधान देणारे असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे शाळेसमोरील वेगवेगळ्या शैक्षणिक समस्या सांगून ते सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित गमरे यांनी तर आभार प्रदर्शन जयप्रकाश खेडेकर यांनी केले. या कार्यक्रमास इयत्ता नववी व दहावीतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 

चौकट –

फोटो :  

विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावणारी विद्यार्थिनी दीक्षा लाड ९२ टक्के, द्वितीय क्रमांक सृष्टी लाड ८७.८०टक्के, तृतीय क्रमांक दीक्षा कांबळे ८५.८० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सुहास राजेशिर्के यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी शिक्षक वर्गही उपस्थित होते (छाया : ओंकार रेळेकर)

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com