युवराज डोंगरे/खल्लार
पुलावरुन ट्रॅक्टर खाली कोसळून 32 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.हि दुर्दैवी घटना आज 26 जुनला दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान घडली या दुर्दैवी घटनेमुळे खल्लार परिसरात दुःख व्यक्त होत आहे.
निलेश तुळशिराम बनसोड वय 32 असे मृतकाचे नाव असुन अजय शंकर बहुराशी असे जखमी युवकाचे नाव आहे दोघेही चंद्रपूर येथील रहिवासी आहेत.
मृतक निलेश बनसोड व अजय बहुराशी हे शेतात ट्रॅक्टर घेऊन पंजी मारण्यासाठी जात असतांना खल्लार अंजनगाव रोडवरील चंद्रभागा नदीच्या मोठ्या पुलावरुन ट्रॅक्टर पुलावरील कठडे तोडून चंद्रभागा नदी पात्रात कोसळला यात चालक निलेश बनसोड याचा जागेवरच मृत्यू झाला.तर जखमी युवकास पुढील उपचारार्थ अमरावती येथे हलविण्यात आले.घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटना माहीत होताच खल्लार पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनायक लंबे, दुय्यम ठाणेदार रामरतन चव्हान, पो हे कॉ शरद डाहाके,पो हे कॉ ज्ञानेश्वर सिडाम, पो कॉ शाकिर शेख हे लगेच घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हारुग्णालय,दर्यापूर येथे पाठविला.
मृतकाच्या मागे आई, वडील,पत्नी, दिड वर्षाचा लहान मुलगा, भाऊ असा आप्त परिवार असुन अशी दुर्दैवी पहिल्यांदाच घडली आहे या घटनेमुळे खल्लार परिसरात सर्वत्र शोक व्यक्त केल्या जात आहे