पंकज चहांदे
दखल न्यूज भारत
देसाईगंज- महिला बचत गटाच्या वतीने विविध साहीत्य, गृहप्रयोग खाद्य पदार्थ, शेती विषयक औषधी, खते, बियाणे आदी गृह उद्योगाप्रमाणे बनविण्यात येत असून अशा प्रदर्शनीतून बचत गटांना चालणा मिळेल असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले. ते भारतीय स्वातंत्र्यास १५ ऑगस्ट २०२१ ला ७५ वर्ष पुर्ण झाले. या गौरवशाली पर्वानिमित्य केंद्र शासनाद्वारे आजादी का महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्याने देसाईगंज नगर परिषद द्वारा माता वार्ड दुर्गा मंदिर परिसरात आयोजित स्वयंसहायता बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंची प्रदर्शनी व विक्री या कार्यक्रमा दरम्यान बोलत होते.
प्रदर्शनीचे उद्घाटन आ. कृष्णा गजबे यांनी फित कापून व दिप प्रज्वलीत करून केले. यावेळी माजी. नगराध्यक्ष शालुताई दंडवते, जेसाभाऊ मोटवाणी, माजी उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, निलोफर शेख, मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा, प्रेस क्लब अध्यक्ष प्रभातकुमार दुबे, उपाध्यक्ष विलास ढोरे, सचिव राजरतन मेश्राम, प्रा. दयाराम फटींग, प्रकाश दुबे, इलियास खान, पिंकु बावणे, कोसरे, हरगोविंद जोशी आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना आ. गजबे म्हणाले की, महिलांनी उत्पादीत केलेल्या साहीत्यामुळे महिलांना रोजगाराची संधी प्राप्त झाली असून त्यांना विक्रीकरीता प्रदर्शनी हे चांगले माध्यम आहे. प्रदर्शनीत एकाच ठिकाणी सर्वच बचत गटांनी तयार केलेले साहीत्य मिळण्याची सोय होते. नागरिकांनी सुद्धा महिलांचे जिवनमान उंचावण्याकरीता प्रदर्शनीत विक्रीस आणलेले साहीत्य खरेदी करून त्यांना आर्थिक हातभार लावण्यास मदत करावी असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा, संचालन व आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे यांनी केले. प्रदर्शनीत तालुक्यासह इतर तालुक्यातील महिला बचत गटांनी आपले साहीत्य विक्री आणले होते. सदर प्रदर्शन दोन दिवस चालणार असल्याची माहिती मुख्याधिकारी आश्रमा यांनी दिली.