कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यक संदीप घुले यांनी खरीप पिकच्या पूर्व नियोजनासाठी प्रशिक्षण.

  बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे कृषी विभागा मार्फत कृषी सहाय्यक संदीप घुले यांनी शेतकऱ्यांना शेती विषय प्रशिक्षण देण्यात आले.

            यंदा मान्सूनची चाहूल लागताच मान्सून पूर्व खरीप हंगाम नियोजन बैठक पिंपरी बुद्रुक येथे कृषी विभागामार्फत आयोजित केली, यावेळी खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक मका पिकासाठी जैविक वीज प्रक्रिया व घरगुती बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिकाचे आयोजित केले होते.

            मका पिकासाठी अझोटोबॅक्टर व पी. एस. बी या जिवाणू खतांची व ट्रायकोडरमा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करुन पेरणी करावी आसे आवाहन कृषी सहाय्यक संदीप घुले यांनी केले . तसेच कृषि विभागाच्या विविध योजनांची साविस्तर माहितीही देण्यात आली.

          यामध्ये महाडीबीटी, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, एमआरजीएस योजना, आपत्कालीन पीक व्यवस्थापन, बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, सी आर ए टेकनिक, ऊस रोपवाटिका, याबद्दल सविस्तर माहिती दिली.

         या प्रशिक्षणासाठी पिंपरी बुद्रुक मधील माजी सरपंच श्रीकांत बोडके, बबन बोडके, सुदर्शन बोडके, संतोष, सुतार, वर्धमान बोडके, बाळासाहेब घाडगे, तय्यब शेख, शंकर रनदिवे, दादाभाई शेख, साहेबलाल शेख उपस्थित होते.