ग्राम पंचायत मधील होत असलेल्या भ्रष्टाचाराला विस्तार अधिकारी ( पंचायत ) याचा पाठिंबा?…

तालुका प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी

दखल न्यूज़ भारत

 

लाडबोरी: गावाची विकासाचा केंद्र बिंदू व गावाची ससंद म्हणून ज्याच्या कडे बघितले जाते ती ग्राम पंचायत या ग्राम पंचायत मध्ये गावातील नागरिकांनी आपल्या मताच्या अधिकारातून गावाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी ना निवडून देण्यात आले, पण निवडून आलेले सत्ता मधील लोक प्रतिनिधी गावाचा विकास न करता स्वतःचा स्वार्थ साधतं गावातील नागरिकाच्या कडून मिळत असलेल्या टॅक्स चा व त्यांचा घामाच्या दामाचा निधी हा सत्तापक्ष लोक प्रतिनिधी आपल्या मर्जीने मनमानी पणा करीत नियमाबाह्य खर्च करण्यात आला, सामान्य नागरिकांच्या मिळकती ची उधळपट्टी बाबत ग्राम पंचायत मधील विरोधी पक्षनेते व ग्राम पंचायत सदस्य कमलाकर बोमनपल्लीवार 

यांनी ग्राम पंचायत मधील सत्तापक्ष लोक प्रतिनिधी जनतेच्या पैश्याची 

करीत असलेल्या उधळ पट्टी बाबत पंचायत समिती सिंदेवाही इथे दिनांक 02/05/2023 ला

तक्रार दाखल केली, पण दाखल केलेल्या तक्रारीवर विस्तार अधिकारी ( पंचायत ) यांनी

अजूनही कोणतेही चौकशी केली नाही ,त्यामुळे तालुक्यात होत असलेल्या ग्राम पंचायत च्या भ्रस्टाचाराला सर्वस्वी गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी ( पंचायत ) यांचा पाठिंबा असल्याने आज ग्राम पंचायत मधील लोक प्रतिनिधी व कर्मचारी भ्रस्टाचार पोसत आहे, असे स्पस्ट पणे दिसून येत आहे ,

 गावातील नागरिकांनी आपला प्रतिनिधी म्हणून लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी च्या 

तक्रारीवर चौकशी केल्या जात नाही तिथे सामान्य नागरिकाच्या तक्रारीवर किती चौकशी करीत असतील असा प्रश्न निर्माण होत आहे, म्हणून अश्या बेपर्वा अधिकारी वर्गाच्या कामाकाजाच पितळ जनतेसमोर उघड आणी यांना नागड करण्यासाठी संविधानिक मार्गाने तहसील कार्यालय सिंदेवाही समोर दिनांक 30/05/2023 ला रोज मंगळवार ला पंचायत समिती सिंदेवाही मधील गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी ( पंचायत) पंचायत समिती सिंदेवाही यांचा जाहीर धिक्कार व निषेध आंदोलन करण्याचा इशारा कमलाकर बोमनपल्लीवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.