भिसी नगरपंचायतचा पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्रावरून बंद. — दुषीत पाणी प्रकरणाची दखल.

 

 दिक्षा कऱ्हाडे

वृत्त संपादिका

         नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या भिसी नगरपंचायतच्या जलशुद्धीकरण केंद्रात गढूळ गाळ साचल्याने या जल शुद्धीकरण केंद्रातून होत असणारा पाणीपुरवठा गढूळ स्वरूपाचा होत आहे.

       यामुळे भिसी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी दि.२७ में पासून जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा तात्पुरता बंद करून नागरीकांना टँकरने पाणी पुरवठा करन्याचा निर्णय घेतला आहे .

           विशेष बाब म्हणजे काही दिवसांपासून काही प्रमाणात दुषीत पाणी येत असल्याने पाणी पुरवठा विभागातर्फे अल्यमचा व साचलेला दुषीत गाळ काढन्यात आला. 

        परंतू पाणी अद्यापही स्वच्छ येत नसल्याने व नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांनी जलशुध्दीकरण केंद्रावर टेकनिकल व्यक्तीना बोलावून जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी केली असता जेवढा गाळ नगरपंचायतने सध्या स्थितीत काढला आहे तेवढाच गाड पुन्हा खाली शिल्लक असल्याचे दिसून आले.

       त्यामूळे हा संपूर्ण गाळ स्वच्छ केल्याशिवाय पाणी स्वच्छ येणार नाही असे लक्षात आल्याने गाळ स्वच्छ होई पर्यंत भिसी नगर पंचायतला पाणी पुरवठा हा टँकरने करन्यात येईल व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याशी देखील पत्र व्यवहार करण्यात आले आहे.

       मजीप्रा चे अधिकारी पाहणी साठी येणार असल्याचे कळवले आहे,अशी माहिती भिसी नगर पंचायतच्या मुख्याधिकारी यांनी वार्तालाप करताना दिली.

       विशेष बाब म्हणजे जल शुद्धीकरण केंद्रातील गाळ ८ ते १५ दिवसातून बॅकवॉश फ्लशिंग द्वारे एकदा स्वच्छ व्हायला हवे. मात्र जल शुद्धीकरण केंद्र तयार झाले तेव्हापासून या जल शुद्धीकरण केंद्राची स्वच्छताच झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

        त्यामूळे या जलशुद्धीकरण केंद्रात ८ ते १० फुट गाळ व वर्षानुवर्षाचा आलम साचला आहे.