शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर… — छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न…

ऋषी सहारे 

संपादक

देसाईगंज: 

      देसाईगंज शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालयातर्फे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते संपन्न झाले.

     यावेळी हा उपक्रम स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक व सुशिक्षित बेरोजगारांसाठी आशेचा किरण ठरेल असे ठाम मत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी यांनी व्यक्त केले. देशातील बेरोजगारीवर उपाय म्हणून स्वयंरोजगार व कौशल्य विकासाचे महत्त्व ओळखणारे नरेंद्रजी मोदी हे प्रथम पंतप्रधान होय. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे देशात कौशल्य विकासाला चालना मिळाली पंतप्रधानांच्या संकल्पनेला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास मंत्रालयातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

     शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयोजित कार्यक्रमा प्रसंगी आमदार कृष्णाजी गजबे, जे. पी. लोंढे उपविभागीय अधिकारी देसाईगंज, अविनाश पिसाळ नायब तहसीलदार देसाईगंज, डॉ. कुलभूषण रामटेके मुख्याधिकारी न.प. देसाईगंज, किरण एच. रासकर पोलिस निरीक्षक, राजु एम. मुंडे प्रबंधक स्टेट बँक ऑफ इंडिया देसाई गंज, आफताब आलम खान व्यवस्थापक ए ए एनर्जी लिमिटेड देसाईगंज, डॉक्टर लालसिंग खालसा प्राचार्य महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी, मुरलीधर सुंदरकर सुभाष इंजीनियरिंग देसाईगंज, योगेंद्र शेंडे सहा. आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली, डॉक्टर अविनाशजी मिसार वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय देसाईगंज, सुरेश चौधरी प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज, वैभव बोनगिरवार जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी गडचिरोली, शालूताई दंडवते माजी नगराध्यक्ष देसाईगंज, संगम मॉलचे संचालक लक्ष्मनजी रामाणी, पदम कपडा बाजारचे संचालक संतोषजी शामदासानी, सामाजिक कार्यकर्ते उपाध्याय मॅडम, कहुरके , गोबाडे , प्रा. संजयजी कुथे तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथील सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.