खल्लार कनिष्ठ कला महाविद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम, कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 88.63%

 

युवराज डोंगरे 

उपसंपादक

      महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या, अमरावती विभागाद्वारे घेण्यात आलेल्या 12 वी च्या परीक्षेचा निकाल 25 मे रोजी जाहीर करण्यात आला असून श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित असलेल्या खल्लार कनिष्ठ कला महाविद्यालयाने आपली उत्कृष्ठ यशाची परंपरा कायम ठेवली आहे. खल्लार कनिष्ठ कला महाविद्यालयाचा 12 विचा निकाल 88.63% एवढा लागला आहे.

     कनिष्ठ महाविद्यालयातून कु तेजस्विनी रविंद्र कडू प्रथम क्रमांक, कु समिक्षा यशवंत दहाट,द्वितीय क्रमांक, कु आकांक्षा कैलास इंगळे तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. तर कु गौरी रामकृष्ण मदनकर,कु सुहानी सुनिल मोहोड, कु शिवानी अजाबराव सोळंके या विद्यार्थ्यांनी प्रथम श्रणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्वागत करुन कनिष्ठ कला महाविद्यालयाच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे.