ऋषी सहारे
संपादक
सुरजागड येथील लोह खनिज उत्खननावर आधारित असलेल्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी नजीकच्या प्रस्तावित लोह प्रकल्पाचे काम सुरू असून त्यामध्ये कंपनीकडून स्थानिकांना नोकरीत प्राधान्य न देण्याची व भूमि स्वामीना अल्प मोबदला देण्याच्या अन्यायकारक भूमिकेमुळे परिसरात व जिल्ह्यात कंपनीवर रोष व्यक्त होत आहे.
या परिसरातील तरुणांनी ३ जून रोजी कंपनी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.त्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी पाठिंबा दिला आहे.
सुरजागड लोह प्रकल्प चालू करताना सरकारकडून व कंपन्यांकडून अनेक आश्वासने दिल्या गेली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील तरुणांना रोजगार ,नोकरी व अधिग्रहित जमिनीला योग्य दर व अनेक विकासात्मक व पर्यावरण पूरक योजना व निसर्गाचा ऱ्हास न करता खनीकर्म करण्याची भूमिका घेण्यात आली होती.
परंतु या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे.रस्त्यांची दुरवस्था त्यामुळे वारंवार होणारे अपघात यात निरपराध लोकांचे प्राण गेलेत त्यांना जबाबदार कोण?
ज्या कुटुंबातील लोकांचे अपघातात निधन झाले त्या परिवारांची जबाबदारी कोणाची ? त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषणाची जबाबदारी घेण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करण्याची भूमिका घेत असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
याप्रसंगी जिल्हा सचिव डॉ. राजेंद्र गडपल्लीवार, जिल्हा उपाध्यक्ष हरिश वलादे ,सोनल वाकुडकर, जिल्हा उपाध्यक्ष रणजीत बनकर , वेणू गोपाल जिल्हा उपाध्यक्ष, मा न वी से जिल्हाध्यक्ष स्वप्निल वाढई, दीपक डोंगरे, गौरव सोनुले, हर्षल बोरकुटे ,निखिल गोरे आरमोरी तालुका अध्यक्ष विभा बोभाटे ,उपाध्यक्ष ज्योती बगमारे, चामोर्शी तालुका अध्यक्ष चंद्रकांत पिपरे ,सरिता नैताम, प्रशांत कस्तुरे नागेश तोरम, विकी सोनुले ,आदी मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्वांनी आंदोलनाच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.