2024 निवडणुका म्हणजे,राजकारण्यांचे सांगडे,जनतेचे त्रांगडे आणि लोकशाहीचे धिंडवडे…..

      “लोकशाहीच्या जबाबदार घटकांनी आजी आणि माजी आमदार, खासदार, नामदार तसेच केंद्र व राज्य सरकार यांनी आणि न्यायमंडळानी उच्चं न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने,निवडणूक आयोगाने त्याचप्रमाणे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमानी म्हणजेच पत्रकारितेने ) सर्वसामान्य जनतेला गेल्या 75 वर्षात आपल्या सोईनुसार गृहीत धरल्यामुळे,देखाव्यासाठी असलेली सर्वात मोठी व श्रेष्ठ असणारी लोकशाही आणि संविधान केवळ नैतिक आणि घटनात्मक कर्तव्याला या जबाबदार घटकांनी तिलांजली दिल्यामुळेच,या देशातील लोकशाही आणि संविधान ICU मध्ये शेवटची घटका मोजत आहे.!”

      येथील माजी प्रधानमंत्री आणि आजचे प्रधानमंत्री यांच्या तुलनात्मक कामगिरीचा तसेच विरोधी पक्षांच्या सांसदिय कामकाजाचा इतिहास पाहता,आपण कोणत्या भयानक घातक अशा वळणावर येऊन ठेपलो याची आपण कल्पनाही करू शकणार नाही..

        जेंव्हा,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील सामाजिक आणि आर्थिक समानता स्थापित करण्यासाठी घटनात्मक तरतुदी करून, दूरदृष्टीने देशाचा कायमस्वरूपी सर्वांगीण विकास साधण्यासाठीच संविधानाची निर्मिती केली…. 

           परंतू ,गेल्या अवघ्या 75 वर्षात देश अशा घातक वळणावर येऊन ठेपेल ही कल्पना सुद्धा करवत नाही…….

      याहीपेक्षा भयंकर काय असू शकते? तर ते म्हणजे गेल्या 75 वर्षात ज्या आंबेडकर अनुयायांनी संविधानातील आरक्षणाचा लाभ घेऊन सुखाच्या व चैनीच्या सर्व गरजा भागवून सुद्धा, अशा घातक वळणावर येण्यापासून देशाला व समाजाला वाचवू शकले नाहीत……….

       त्या स्वतःला प्राध्यापक, डॉक्टर्स (पी. एच. डी. धारक) स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या बुद्धीजीवी वर्गाची मौन धारण करण्याची प्रवृत्ती……!!!!!

       म्हणजेच वरील लोकशाहीच्या जबाबदार घटकाबरोबरच या प्रवृत्तीचा वर्ग सुद्धा तेवढाच जबाबदार या परिस्थितीला आहे…..!!!!!”

        म्हणून…..

आता आपल्यालाच ( भारतीय सर्वसामान्य जनतेला ) वरील सर्वप्रकारच्या जबाबदार घटकांना वठणीवर आणण्यासाठी,जाती धर्माच्या व राजकारणांच्या पलीकडे जाऊन मानवता धर्माला अविष्कारीत करण्याच्या दिशेने जाण्यासाठी संविधानातून जागृत होणे हा एकमेव उपाय आहे.”

        त्यासाठी गेल्या 75 वर्षात आपल्या देशातील सरकारांनी संविधान निष्ठा किती जिवंत ठेवली याची उदाहरणे आपल्याला पहावी लागतील.

       जेंव्हा 1989 च्या काळात 

जम्मू – काश्मीर मध्ये अतिरेक्यानी उच्छाद मांडलेला असतांना माजी प्रधानमंत्री विश्वनाथ प्रतापसिंघ यांनी उघड्या जीपमधून काश्मीरचा दौरा केला होता…

        आणि आमचे आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भिऊन पंजाबच्या सीमेवरून दिल्ली गाठली…….!!!!

        माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षात असलेले अट्टल बिहारी वाजपेयी यांची युनोमध्ये भारताची बाजू मांडण्यासाठी निवड करणे म्हणजे लोकशाहीचा आदर करण्याचे कार्य केले……. 

       आणि इथे 142 विरोधी खासदारांना संसदेबाहेर काढून अनेक कायदे पारित करून लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचे काम येथील आजच्या केंद्र सरकारने केले…..!!!

          आजपर्यंत कोणत्याही गृहमंत्री आणि प्रधानमंत्री यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गंभीर गुन्हे ( अनैतिकतेचे ) असल्याची नोंद नाहीं…….

      परंतू,आमचे आजचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर अनेक ( अनैतिकतेचे ) गुन्हे असल्याची नोंद आहे. एवढेच काय तर सुडाने पेटून उठलेले प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अशी प्रतिमा सर्वसामान्य जनतेत झाली आहे…..!!!

       अमेरिकेत ओसामा बिन लादेन कडून अपहृत विमानाद्वारे दहशतवादी हल्ला होऊन हजारो निरापराध लोकांचा बळी गेला. याचा सूड अमेरिकेनी पाकिस्तानात जाऊन लादेनचा खात्मा केला. 

        परंतू,मुंबई बोंबस्फ़ोटातील मुख्य आरोपीला म्हणजेच दाऊदला फरफटत आणण्याची भाषा निवडणुकीच्या रणधुमाळीत करतो,प्रत्यक्षात मात्र पाकिस्तानात चुकून गेलेल्या अभिनंदनला परत आणण्यासाठी इंटरपोलची मदत घेतो…..!!!!

           1975 मध्ये केवळ अहंकार दुखावला म्हणून तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशावर विनाकारण ( आणीबाणी घोषित करण्यासाठीची सबळ कारणे नसतानाही ) आणीबाणी घोषित केली…….

      म्हणूनच तत्कालीन वर्तमानपत्रानी काळादिन म्हणून घोषित केला….!

        1992 मध्ये तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांनी सरकारला सूचना केली की,मतदान कार्डावर मतदाराचा फोटो पाहिजे.त्यावर तत्कालीन प्रधानमंत्री पी.व्ही.नरसिंहराव यांनी सांगितले की,हा खूप खर्चिक आणि वेळखाऊ उपक्रम आहे. शत्यावर टी.शेषन यांनी स्पष्ट सांगितले की जोपर्यंत मतदानकार्डावर मतदाराचा फोटो दिसणार नाही,तोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होणार नाहीत.

    ह असा जनतेचा मूलभूत हक्कात सर्वश्रेष्ठ असलेला मताचा अधिकार जपण्यासाठी तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्तानी सरकारच्या विरोधातील घेतलेली भूमिका ही संविधाननिष्ठ अशीच होती….. 

      परंतू,आज सर्वसामान्य जनता,देशातील वकील,विविध संघटना याच EVM ला हटविण्यासाठी रस्त्यावर उतरून विरोध करत असतांना,येथील मुख्य निवडणूक आयोग मात्र RSS चा,बटिक होऊन संविधान पायदळी तुडवीत आहे…..!

        एकंदरीत,या देशातील व्यवस्था मात्र संविधानविरोधी वर्तन करत असतांना आम्ही ( जनता ) मात्र केवळ बघ्याचीच भूमिका गेल्या 75 वर्षात घेतल्यामुळे ही अन्याय सहन करण्याची वृत्ती दुनावली आणि आम्ही गुलामीच्या दिशेने जात आहोत……!!!

     निदान आत्तातरी आम्हाला ही संविधान जागृती करणे आवश्यक बनले आहे.

     आजपर्यंत आमच्यात एक या संविधान आणि लोकशाहीच्या बाबतीत एक गैरसमज पसरविल्या गेला आहे. तो म्हणजे केवळ पाच वर्षातून एक वेळ होणाऱ्या सर्वप्रकारच्या निवडणुका घेण्यासाठीच या लोकशाही व संविधानाची निर्मिती झाली आहे.

     आणि यामध्ये केवळ राजकीय पक्षांचीच भूमिका सर्वकाही असते.

       परंतू ,जर आम्ही संविधानाची उद्देशीका जर समजून घेतली असती की, आम्ही भारताचे लोक या वाक्यापासून सुरुवात होऊन शेवटी स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. ही दोन वाक्य जरी आम्ही समजून घेतलो असतो तर, निश्चितपणे आम्ही आमच्यात विभूतीपूजेला वाव दिला नसता…….

       आणि आज सत्ताधारी व विरोधक जे राज्यात आणि देशात एकमेकांवर खोट्या विकासाच्या नावावर जनतेसमोर चिखलफेक करतात,ती करूच शकले नसते……!!!!

     त्याचप्रमाणे पूर्वी केवळ प्रिंटमीडियाच या देशात होती. त्यावेळी पत्रकारिता जागृत होती.केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात खंबीर भूमिका मांडताना कोणतीच भीती बाळगत नव्हते……

        अल्पसंख्यांकांच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्याची जबाबदारी ते पेलत होते.पूर्वीची वर्तमानपत्रे कधीही बातमीतपत्रे झाली नाहीत…. 

      परंतू,आजची वर्तमानपत्रे कधीच बातमीपत्रे होऊन आता ती ” जाहिरात पत्रे ” झालेली दिसत आहेत…..!!!

    उच्चं न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय यांनी सुद्धा जनतेची विश्वासार्हता गमावून बसलेली आहेत…!

एकंदरीत सांगावयाचे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मिलेले,”भारताचे संविधान आणि संसदीय लोकशाही,यांना टिकविण्यासाठी आपल्याला राजकारणाच्या,जातीधर्माच्या पलीकडे जाऊन मानवता धर्माला अविष्कारीत करण्यासाठीच एक पाऊल पुढे येवून काम करावे लागेल……. 

        कारण,माझे खुले आव्हान आहे की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधानावर देश 100% राज्यकर्त्यांनी चालवीला असता तर निश्चितपणे आमचा एकही शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केला नसता…….

      जनतेला महागाई,बेरोजगारी,नक्षलवाद,दहशतवाद,या संकटाना तोंड देण्याची वेळच आली नसती.एवढेच काय दरडोई एक लाख रुपयाचे कर्ज सुद्धा झाले नसते ……

      शेवटी,या देशाला कोणताही महापुरुष,किंवा अवतारी पुरुष, किंवा देव,ईश्वर वाचविण्यासाठी येऊ शकणार नाहीं,तर केवळ संविधानच आपल्याला वाचवणार आहे……. 

      त्यासाठी संविधानविरोधी शक्तीला संपविण्यासाठीच आपले योगदान असावे……

     अन्यथा व्यवस्थेकडून येणाऱ्या मानसिक गुलामीचे स्वागत करण्यास तयार राहावे…..

              आवाहनकर्ता  

            अनंत केरबाजी भवरे संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689