आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अखेर साखळी उपोषणाला सुरुवात… — साखळी उपोषणाचा उद्देश योग्य,मात्र सर्व बाजूंनी चौकशी होणे आवश्यक किंवा चौकशीची मागणी करणे आवश्यक!…

 

  प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक 

      राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिमूर अंतर्गत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाला अनुसरून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी काही ठेवीदार व खातेदार तहसील कार्यालय चिमूर समोर साखळी उपोषणाला आजपासून बसले आहेत.

        मात्र,साखळी उपोषणातंर्गत वास्तव आणि उद्देश हे कायदेशीर दृष्ट्या योग्य असतील तरच उपोषण कर्त्यांना कायदेशीर सहकार्य मिळू शकते. 

       राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.चिमूर र.न.८०३ चे झालेले चाचणी अंकेक्षण हे द्वेषपुर्वक व दोषपूर्ण असल्याची शंका असल्याने न्यायप्रविष्ट प्रकरणातंर्गत जाईन्ड रजिस्टार नागपूर यांच्या निर्णयाकडे तपास यंत्रणांचे बारकाईने लक्ष आहे.

           जाईन्ड रजिस्टार नागपूर हे प्रथमदर्शी युक्तिवादान्वये काय निर्णय देतात यावर चाचणी आॅडीटचे भविष्य अवलंबून आहे.

     प्रशासक राजेश लांडगे यांनी केलेले चाचणी आॅडीट,जाईन्ड रजिस्टार कोर्टात २८ एप्रिल ला टिकाव धरू शकले नाही तर बाकीच्या बोंबाना सध्या महत्त्व उरणार नाही.