औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मुळ नाव संत जगनाडे महाराज ठेवण्याची मागणी… — संताजी अखिल तेली समाज कन्हान संघटनेचे मुख्याधिकारी यांचा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन..‌.

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

      नागपुर येथील संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतराच्या प्रस्तावाला,”संताजी अखिल तेली समाज कन्हान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 

      व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय,नागपूर यांनी दि.१८ मार्च २०२५ रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार,संस्थेच्या नावात बदल करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

        मात्र,या नामांतराच्या निर्णयाला संताजी अखिल तेली समाज कन्हान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून,कन्हान – पिपरी नगर परिषद मुख्याधिकारी दिपक घोडके यांचा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवुन संस्थेचे मूळ नाव संत जगनाडे महाराज कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

        संत जगनाडे महाराज हे महाराष्ट्रातील पुरोगामी संत आहेत.त्यांनी त्याकाळातील जाती व्यवस्थेच्या व धर्मातील कर्म कांडावर घणाघाती टिका करून समाजाला धर्मातील पारंपारिक दुष्ट प्रथा बंद करण्यास आपल्या किर्तनाच्या माध्यमातून तसेच संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतुन जनजागृती केली. 

       संत जगनाडे महाराज यांचा समाजाला त्याकाळात शिक्षीत करण्याचे कार्य आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना शिक्षीत करण्याचे कार्य कुठेतरी मिळते जुळते आहे. 

       संत परिवारातील सर्वश्रेष्ठ संत म्हणून त्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे.वारकरी संप्रदायातील संत जगनाडे महाराज हे तेली समाजाचे सुद्धा दैवत आहे.

      शासनाने सर्व गोष्टींचा विचार करून तेली समाजाचा,वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्रातील संत पुरोगामी विचारांचा सन्मान करून औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर या शासकीय संस्थेचे मुळ नांव संत जगनाडे महाराज यथाचित (जैसे थे) ठेवण्यात यावे,अशी मागणी संताजी अखिल तेली समाज कन्हान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कन्हान – पिपरी नगर परिषद मुख्याधिकारी दिपक घोडके यांचा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवुन केली आहे.

        या प्रसंगी संताजी अखिल तेली समाज संघटनेचे नागपुर जिल्हा संर्पक प्रमुख सुर्यभान चकोले,कन्हान शहर अध्यक्ष सुनिल सरोदे,कार्याध्यक्ष ऋषभ बावनकर,उपाध्यक्ष निर्णय कुंभलकर,राजेश लेंडे,विनोद किरपान,मारोती तरारे,योगेश ईखार,विलास घारपिंडे,शंकर कारेमोरे,नंदकिशोर कामडी सह आदि समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

विविध संघटने कडुन सुध्दा तीव्र विरोध…..

     या प्रस्तावाचा संताजी अखिल तेली समाज कांद्री,येथील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करुन औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर या शासकीय संस्थेचे मुळ नाव संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यथाचित,जैसे थे ठेवण्याची मागणी नगर पंचायत कांद्री मुख्याधिकारी सचिन गाढवे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनातून मागणी केली आहे. 

      या प्रसंगी कांद्री शहर अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,गणेश सरोदे,नरेश डांगरे,गोलु वांढरे,राजेश पोटभरे,विवेक वांढरे,प्रकाश चापले,संकेत चकोले,वामन देशमुख सह आदि समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.