
युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करणे व व्याख्यानातून फक्त त्यांचा लढाई पुरता इतिहास सांगणे एवढेच आज केले जाते.पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन सर्व जनमानसाला प्रेरणादायी होते.
शेतकरी हिताचा, दूरदृष्टी असणारा राजा, रयतेसाठी जगणारा राजा म्हणून शिवराय समजून घेणे महत्वाचे आहे,आजच्या राजकीय नेत्यांनी राजकारण करताना शिवरायाचे विचार समजून घेणे महत्वाचे असून शिवरायांचा इतिहास लढाई पुरता नाही तर कल्याणकारी राजाचा आदर्शवाद आहे,असे प्रतिपादन सुप्रसिद्ध युवा व्याख्याते शिवव्याख्याते अक्षय राऊत यांनी केले.
ते दर्यापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना दर्यापूर तालुका यांच्या वतीने तालुकाप्रमुख मनोज पाटील तायडे यांच्या संकल्पनेतून तिथीनुसार आयोजित शिव जन्मोत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संत गाडगेबाबा बालगृहाचे संचालक गजानन देशमुख उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर तराळ आदी उपस्थित होते.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने आयोजित बॅटमिंटन स्पर्धा, फलक लेखन स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,थाळी सजावट स्पर्धा या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
फलक लेखन स्पर्धामध्ये प्रबोधन महाविद्यालय दर्यापूर प्रथम तर आदर्श प्राथमिक शाळा दर्यापूर व प्रबोधन प्राथमिक शाळा दर्यापूर यांना समान द्वितीय क्रमांक देण्यात आला.
बॅडमिंटन खुला दुहेरी गट स्पर्धेमधील प्रथम क्रमांकची जोडी ओम शिवानंद चव्हाण व श्रेयस करंजकर यांनी पटकावले तर द्वितीय क्रमांक पार्थ तायडे व सुरज ठाकूर यांनी पटकावले.
तसेच खुला ओपन मधून ओम शिवानंद चव्हाण तर द्वितीय पार्थ रितेश तायडे महिला गटामधून प्रेरणा बनसोड प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक गौरी मंडासे ,१४ वर्षा आतील सिंगल प्रथम क्रमांक अभिनंदन तायडे द्वितीय क्रमांक पृथ्वी कासारकार यांनी नववर्षाआतील मधुन प्रथम क्रमांक हार्दिक तायडे द्वितीय क्रमांक रती तायडे यांनी पटकावले.
थाली सजावट मध्ये प्रथम क्रमांक सीमा महेंद्र दिघडे द्वितीय क्रमांक रोहिणी राहुल प्रांजळे, तृतीय क्रमांक प्राची अमित शहा यांनी पटकावले.रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मोहिनी इंगळे द्वितीय क्रमांक जयश्री काकड तृतीय क्रमांक माया कोकाटे तर पंधरा वर्षातील प्रथम क्रमांक निधी अतुल तराळे,तृतीय क्रमांक स्वराली चाकण, तृतीय क्रमांक शुभ ठाकरे यांनी पटकावले.
बॅडमिंटन स्पर्धेमध्ये १७५ तर थाली सजावट मध्ये ३० रांगोळीमध्ये ३२ स्पर्धकांनी भाग घेतला होता.या शिवजन्मोत्सव निमित्त राबवण्यात आलेल्या स्पर्धेचे दर्यापूर शहरांमध्ये कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रणजित गणोदे यांनी केले तर संचालन प्रा.धनंजय देशमुख, बक्षीस वितरण संचलन रामभाऊ जऊळकार यांनी केले व आभार प्रदर्शन तालुकाप्रमुख मनोज पाटील तायडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला तालुकाध्यक्ष हर्षाताई बावनेर,उपतालुका प्रमुख पंकज कदम, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख प्रथमेश राऊत, गोपाल तराळ,संदीप झळके,राम शिंदे,अनिकेत सुपेकर,संतोष रामेकर,जोशी महाराज,जनार्दन पाटील गावंडे ,बंडूभाऊ सांगोले, मेहेर ठाकरे,सुरेश आप्पा कुल्ली, आदीनी परिश्रम घेतले.