
ऋषी सहारे
संपादक
कुरखेडा :– आजाद समाज पक्षाच्या जन संवाद यात्रे दरम्यान कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली असता आज 25 मार्च रोजी सकाळीच प्रसूती दरम्यान एका बाळाचा मृत्यू झाल्याची व रुग्णांच्या जेवणात भ्रष्टाचार असल्याची बाब उघडकीस आली.
भेटीदरम्यान रुग्णालयात प्रशासकीय असुविधेमुळे व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरते मुळे प्रसूती दरम्यान एका बालकाचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब पुढे आली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. ठमके यांनी यावर सारवासारव केली.
आकस्मिक भेटी दरम्यान
१)उपजिल्हा रुग्णालय असून सुद्धा कायम स्वरूपी एकही स्त्रीरोग तज्ञ नाही व सर्जन सुद्धा नाही.
२) डॉ. डोंगरवार यांची नियुक्ती कुरखेडा रुग्णालयात आहे पण त्याना डेपोटेशन गडचिरोली ला देण्यात आल्याने ते केवळ गुरुवार ला उपस्थित असतात.
३)जर आज रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ असते व सर्जन असते तर बाळाचा मृत्यू झाला नसता असे मृत बाळाचे पालक दिव्याणी व प्रफुल चवरे यांनी सांगितले.
४) हॉस्पिटल मध्ये एकूण 7 वैद्यकीय अधिकारी असून पैकी 3 वैद्यकीय अधिकारी डेपोटेशन वर बाहेर आहे व सर्जन ला अनेकदा बाहेरून बोलविल्या जाते पण वेळेत ते उपलब्ध होत नाहीत.
बाळाच्या मृत्युला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. असा आरोप आजाद समाज पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.
इतर लक्षात आलेल्या समस्या..
१)रुग्णालयात रुग्ण व एक नातेवाईक यांना जेवणाची सोय करणे अनिवार्य असते. परंतु कुरखेडा रुग्णालयातील रुग्णाच्या नातेवाईकांशी चर्चा केली असता लक्षात आले एकाही नातेवाईकांला जेवणाची सुविधा मिळत नाही व प्रशासनाकडून कोणतीही दखल आजवर घेतली नाही.
२) अधीक्षक डॉ. ठमके यांचेशी चर्चा केली असता त्याना व त्यांच्या एकही कर्मचाऱ्यांना या विषयी माहिती नसल्याचे सांगितले. यावरून रुग्णालयचे अधीक्षक यांची यावर काहीही लक्ष नसल्याचे समजते.
३) मेष मध्ये अंडी, दूध व केळी नाश्त्यात भेटायला हवी परंतु केवळ केळी मिळतात पण दूध व अंडी मिळत नाही. यासाठी जबाबदार कोण?
४)रात्री एका पेशंट चा मोबाईल चोरी गेला असता प्रशासनाकडून त्याना सहकार्य होताना दिसलें नाही. आजाद समाज पक्षाने मुद्दा उचलल्याने वैद्यकीय अधीक्षकांनी cctv फुटेज चेक केले. परंतु यावरून रुग्णालयातील security नामधारी असल्याचे यातून स्पष्ट होते.
एकूणच रुग्णालयात पायाभूत प्रशासकीय सोयी सुविधांचा मोठा अभाव दिसला असून आजाद समाज पार्टी ने 8 दिवसात यावर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड, प्रभारी विनोद मडावी, सचिव प्रकाश बनसोड, कुरखेडा प्रमुख सावन चिकराम, आदिवासी विकास परिषद चे अंकुश कोकोडे, सतीश दुर्गमवार, युवा नेते राहुल कुकुडकर, रोहित कोडवते उपस्थित होते.