
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी समाधान शिबिर अंतगत “१०० दिवस कार्यक्रम” अंतर्गत महसूल विभागाचे विविध योजनेचे लाभ लाभार्थ्यांना मिळण्याच्या उद्देशाने जिल्हा परीषद शाळा चारगाव नवेगाव खैरी मंडल येथे गुरुवार दिनांक २७/०३/२०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजता पर्यत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने तहसिल कार्यालयातील निवडणूक विभाग, संगायो विभाग, पुरवठा विभाग, सेतू विभाग, आधार केंद्र, पि एम किसान योजना, महशुल विभाग , महावितरण कंपनी, पंचायत समिती अंतर्गत सर्व विभाग, कृषी विभाग, सहायक निबंधक रुहकारी संस्था, उपअधिक्षक भुमी अभिलेख, आरोग्य विभाग, पशुसर्वधन विभाग बाधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, ग्रमीण पाणी पुरवठा विभाग वनविभाग तसेच नवेगाव खैरी मंडळातील ग्राम महसूल अधिकारी यांनी अॅग्रीस्टॅक संदभांने कामे करण्यासाठी शिबिराच्या दिवशी व ठिकाणी अधिनस्त कर्मचाऱ्यांसह न चुकता उपस्थित राहावे.
सर्व विभागातील जिम्मेदार अधिकारी कर्मचारि यांनी चारगाव जिल्हा परीषद शाळा चारणाव नवेगाव खैरी मंडळ अंतर्गत तलाठी येथे गुरुवार दिनांक २७ मार्च ला सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत अस्थित राहणार अशी माहिती पारशिवनी तहसिलदार पारशिवनी यांनी माहिती दिली.
ग्राम पंचायत चारगाव यांनी संबंधीत शिबिराबाबत दवंडी देऊन प्रसिद्धी करण्यात आली.
पारशिवनी नायाब तहसिलदार रमेश पागुळे, श्री प्रकाश हारगुडे नायब तहसिलदार संगायो.श्री.रामकिसन दिघोळे नायब तहसिलदार निवडणूक,श्री.स्नेहल देशमुख अन्न पुरवठा निरिक्षण अधिकारी तहसिल कार्यालय पारशिवनी कृषी विभाग पारशिवनी,मंडळ अधिकारी नवेगाव खैरी सह तलाठी चारगाव हे शिविरात उपस्थित राहुत शेतकरी विद्यार्थी गावातील नागरिकाचे शासकीय कामे करणर अशी माहीत तहसिलदार सुभाष वाघ चौरे यांनी दिली.