
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकातंर्गत मौजा पांढरवाणी येथील नागरिक तथा शेतकरी श्री.प्रकाश वाघमारे यांच्या शेतात बांधुन असलेल्या मालकीच्या गायीवर वाघाने हल्ला करुन ठार केले.
वृत्त असे आहे की,पांढरवाणी व नेरीच्या मध्ये २३ फेब्रुवारीच्या पहाटे शेतात बांधून असलेल्या गायीवर हल्ला करुन जागीच ठार केले.वाघाने गाय मारल्याची माहीती शेतकऱ्यांना होताच सदर माहीती वनविभागाला देण्यात आली. लगेच नेरी वनविभागाचे क्षेत्रसहाय्यक सी.एन.रासेकर,वनरक्षक संभाजी वळजे हे वनविभागाची चमु घेऊन घटनास्थळी पोहचले व घटनेचा पंचनामा केला.
गायीची अंदाजे किंमत चाळीस हजाराच्या जवळपास आहे. घटनास्थळी दोन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.या परिसरातील शेतकऱ्यांनी पहाटेच्या सुमारास शेतात जावू नये.वाघ परिसरात फिरत असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.