उसेगांव ग्रामपंचायतला प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ९२ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

          चिमूर‌ तालुकातंर्गत मौजा उसेगांव येथे २२ फेब्रुवारी २०२५ ला ग्राम विकास विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद चंद्रपूर, पंचायत समिती चिमूर,ग्रामपंचायत उसेगांव द्वारा आयोजित प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

         यात उसेगांव येथील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन महोत्सव सोहळ्या दरम्यान ९२ लाभार्थ्यांना ग्रामपंचायत उसेगांव तर्फे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यांना घर कसे बांधायचे यांच्या टीप्स सुध्दा देण्यात आल्या. तुमच्या खात्यात घरकुलाचा पहीला धनादेश जमा झालेला आहे.त्याचा योग्य वापर करण्याचा सल्ला देण्यात आला.

          यावेळी उसेगांव ग्रामपंचायतचे सरपंच प्रीयंका पाटील, उपसरपंच नीखील चाफले, ग्रामसेवक संजय ठाकरे, ग्राम पंचायत सदस्य अशोक कामडी, सुनीता कामडी, मंगला दडमल , कालींदा डांगे, ब्रम्हाजी सांदेकर,  ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी मंडळी उपस्थीत होते.