पळसगांव बफर क्षेत्रात झोगा – मुगा वाघ व बेला सहीत तीच्या पींलाचे दर्शन…. — पळसगांव बफर गेटचे पर्यटकांना आकर्षण‌… — याचबरोबर रोजगारांच्या संधी हव्यात…

 उपक्षम रामटेके/शुभम गजभिये

मुख्य कार्यकारी संपादक/विशेष प्रतिनिधी….

           राष्ट्रीय ताळोबा बपर झोन अंतर्गत येत असलेल्या पळसगाव (पिपर्डा) वनपरिक्षेत्रात अनेक वाघाचे दर्शन होत असल्याने पर्यटकांसाठी सदर क्षेत्र आकर्षणाचे केंद्र बनू लागले आहे.यामुळे या परिसराला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

        चिमूर तालुकातंर्गत मौजा पळसगांव (पिपर्डा) येथे काही दिवस,”नाईट सफारी,सुरू होती.ती बंद झाल्यावर नूनची सफारी होती‌.आता या बफर गेट गेटमधून सकाळ व दूपार असी सफारी चालू झाली आहे.

       पळसगांव (पिपर्डा) बफर गेटमधून ताडोबा सफारी साठी देश विदेशातील अनेक पर्यटक येत आहेत.या क्षेत्रात कारवा,पळसगांव,पिपर्डा,या वनपरिक्षेत्र परिसर येतोय.

       देशविदेशातील पर्यटकांना झोगा- वाघ,झायलो बेला वाघीन व तीचे चार बछड्यांची साईड पर्यटकांना हुकमी मीळत आहे.मुबंई,हैद्राबाद,बेंगलोर,नागपूर,येथील पर्यटकांना त्यांचे दर्शन झाले आहे.

          या बफर क्षेत्रात बिबट,हरीन चीतळ,मोर,रानहल्ले अस्वल यासारख्या वन्यप्राणी पर्यटकांना बघायला मीळत आहेत.त्यामुळे या गेटवरून पर्यटकांची वर्दळ बघायला मीळत आहे.

           ताडोबा आत्तर राष्ट्रीय अभयारण्यातंर्गत पळसगाव (पिपर्डा) वनपरिक्षेत्र देशविदेशातील पर्यटकांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले असले तरी बेरोजगारीमुळे या परिसरातील नागरिक हतबल झाले आहेत.

       या परिसरात रोजगाऱ्याच्या संध्या केंद्र सरकारसह महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिल्यास सदर परिसरातील नागरिकांच्या,युवकांच्या, महिलांच्या,युवतींच्या,हाताला काम मिळेल आणि बेरोजगारीची समस्या दूर होईल अशी अपेक्षा या परिसरातील सर्व नागरिकांना आहे.