
ऋषी सहारे
संपादक
आरमोरी तालूक्यातील मौजा- वनखी येथे दि.२५ फेब्रुवारी २०२४ आहेत रोज रविवार ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यांचे अनावरण सोहळा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा तथा गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या अनावरण सोहळा प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी प्रतिपादन करताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे, रयतेचे लोक राजे होते.
त्यांनी घेतलेली स्वराज्याची शपथ जनतेच्या हिताचे व सर्वांना स्वराज्य संकल्प आपले सुराज्य व्हावे असा होता.
शिवाजी महाराजांचे आत्मचिंतन आचार, विचार आचरणात आणले तर आज होत असलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे सार्थक होईल. असे प्रतिपादन अध्यक्षीय स्थानावरून खासदार अशोक नेते यांनी केले.
पुढे बोलतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे वनखी येथे अनावरण करणे, ही एक चांगली व कौतुकाची गोष्ट आहे.
या क्षणाचे साक्षीदार होऊ शकलो. असे खा.नेते यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणांनी खा.नेते यांनी सुरूवात करत हा परिसर दुमदुमला होता.
जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी उत्कृष्ट शिवाजी महाराजांच्या जीवनावर व चरित्रावर मौलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी मंचावर प्रामुख्याने खासदार अशोक नेते,कार्यक्रमाचे उद्घाटक प्रकाश सा.पोरेड़्डीवार, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,माजी आमदार रामकृष्ण मडावी,माजी आमदार आनंदराव गेडाम,शिक्षण महर्षी भाग्यवान खोब्रागडे,जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, जिल्हा सचिव नंदु पेठ्ठेवार, कृ. उ. बा. समिती सभापती ईश्वर पासेवार, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, माजी.जि.प.अध्यक्ष सोमय्या पसूला, व्याख्याता भास्कर उरकूडे सर,पोलिस ठाणेदार रहांगडाले, मूर्तीकार प्रकाश सोनवाणे, मेश्राम सर, कोटरंगे सर, ओंकार मडावी, संजय गणवीर,तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरिक शिवभक्त बंधू भगिनी उपस्थित होते.