
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नरवडे यांनी विदर्भ प्रदेश कार्यकारणीला मान्यता दिली असून आजपासून विदर्भ प्रदेश कार्यकारणी कायद्यान्वये अधिकारीक कर्तव्यतत्पर झाली आहे.
विदर्भ प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष अँड.प्रतिभाताई गवई असून विदर्भ प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रदीप रामटेके हे जबाबदारी पार पाडणार आहेत.
याचबरोबर विदर्भ प्रदेश सरचिटणीस पदी प्रदीप शेंडे (नागपूर),विदर्भ प्रदेश संघटक पदी ऋषी सहारे आरमोरी (गडचिरोली) तर विदर्भ प्रदेश कोषाध्यक्ष पदी दिक्षा कऱ्हाडे चिमूर (चंद्रपूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
**
तद्वतच मान्यता देण्यात आलेली विदर्भ प्रदेश कार्यकारणी खालील प्रमाणे…
उपाध्यक्ष..
१) प्रितम जनबंधू..
आरमोरी,जिल्हा गडचिरोली.
२) संजय टेंभुर्णे..
साकोली,जि.भंडारा…
३) युवराज डोंगरे
रा.खल्लार,ता.दर्यापूर, जिल्हा अमरावती..
***
सचिव…
१) अबोदनागो चव्हाण
रा.काटकुंभ,ता.चिखलदरा,जिल्हा अमरावती..
२) शेखर ईशापुरे
साकोली,जिल्हा भंडारा..
३) दामोधर रामटेके
चिमूर,जिल्हा चंद्रपूर..
***
सहसंघटक
१) परशुराम पोटे
वणी,जिल्हा यवतमाळ..
२) निलय झोडे
साकोली,जिल्हा भंडारा..
३) ऋग्वेद येवले
साकोली,जिल्हा भंडारा..
**
सदस्य..
१) जाकीर सैय्यद..
हिंगणघाट,जिल्हा वर्धा..
२) विशाल ठोंबरे
वणी,जिल्हा यवतमाळ..
३) उमेश कांबळे
भद्रावती,जिल्हा चंद्रपूर..
४) रोहन आदेवार
मारेगाव,जिल्हा यवतमाळ..
**
एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नरवडे यांनी,”विदर्भ प्रदेश कार्यकारणीला,मंजूरी दिल्यामुळे वरील सर्व पदाधिकारी व सदस्य हे ३ वर्षासाठी पदस्थ झाले आहेत.तद्वतच विदर्भ कार्यकरणीच्या सदस्यांना ११ जिल्हा अध्यक्षांच्या बरोबरीचे महत्त्वपूर्ण स्थान असते.
“एन.जागतिक मानवाधिकार संघटना,कार्पोरेट व्यवहार मंत्रालय केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली रजिस्टर असून,रजिस्टर क्रमांक भारत प्रा.LTD..,Reg:- CIN: क्रमांक :- U85300MH2022NPL396079,असा आहे..
विदर्भ प्रदेश कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी व सदस्य हे सतर्क,जागरूक,संवेदनशील व कर्तव्यदक्ष आहेत.
सर्व समाज घटकांतील शोषित,वंचित,पिडीत, अन्यायग्रस्त,अत्याचारग्रस्त, नागरिकांसाठी कार्य करणे आणि शासन-प्रशासनाच्या माध्यमातून अन्याय दूर करणे हा संघटनेचा मुख्य उद्देश आहे.
याचबरोबर शासन-प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करुन देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि हितासाठी कार्ये करणे हे संघटनेचे आद्य कर्तव्य आहे.
तद्वतच सर्वांच्या सहकार्याने,”विविध उपक्रमांतर्गत, सर्व समाज घटकांतील नागरिकांना त्यांच्या हितसंबंधाने त्यांना आवश्यक माहिती देणे हा मुख्य केंद्रबिंदू संघटनेचा आहे.