खल्लार/प्रतिनिधी
दर्यापूर आगारातील काही वाहक हे वृध्द प्रवाशांशी दुजाभाव करीत आहेत.
दर्यापूर खल्लार आसेगाव या मार्गावर दर्यापूर आगाराच्या एस टी बसेस नियमित धावतात राज्य शासनाने 75 वर्ष वरील जेष्ठ नागरिकांना एस टी बसेसमधून मोफत प्रवास व 65 वर्षावरील नागरिकांना प्रवासात 50 % सवलत दिली आहे.
दर्यापूर खल्लार आसेगाव मार्गावरील धावणाऱ्या एस टी बसचे चालक हे वृध्द प्रवाशांशी दुजाभाव करीत असल्याच्या घटना या मार्गावर घडत आहेत. दर्यापूर आसेगाव मार्गावरील खल्लार हे महत्वाचे ठिकाण या ठिकाणावरून दररोज शेकडो प्रवाशी प्रवास करतात यात वृद्धांचाही समावेश असतो या मार्गावर एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या वृध्द नागरिकांसोबत या मार्गावरील चालक दुजाभाव करीत आहेत.दि 25 फेब्रुवारीला दर्यापूर आगाराची बस क्र 8870 सकाळी 9:30वाजता आसेगाव वरुन खल्लारमार्गे दर्यापूरकडे जात असताना खल्लार थांब्यावर वृध्द प्रवाशांनी चालकाला बस थांबविण्यासाठी हात दाखवूनही थांब्यावर बस न थांबविता दूर जाऊन थांबविली त्यामुळे वृद्ध प्रवाशांना धावत जाऊन बस पकडावी लागली.
अशावेळी जर प्रवास करणाऱ्या वृध्द प्रवाशांच्या जिवित्वास बरे वाईट झाले तर त्यास कोण जबाबदार?असा प्रश्न निर्माण झाला असून या मार्गावर वृद्ध प्रवाशांशी नेहमीच दुजाभाव करणाऱ्या चालकाकडे आगार प्रमुखांनी लक्ष दयावे अशी मागणी वृध्द प्रवाशांनी केली आहे.