कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- दिंनाक २६ /२/२०२३
पारशिवनी तालुक्यातील करंभाड येथील शेतकरी ज्ञानेश्वर आनंदराव काढे वय ५० वर्षे राहणार करभांड यांचा शेतात काम करीत असताना अचानक चक्कर येऊन खाली पडल्याने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पारशिवनी येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुत्यु झाल्याचे सांगितले.
करभांड येथील शेतकरी ज्ञानेश्वर आनंदराव काढे वय वर्षे ५० हे करभांड शिवारात शनिवार दिंनाक २५ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी ११ चे सुमारास शेतात गेले व शेती कामे सुरू केली.
मात्र अचानक शेतकरी ज्ञानेश्वर आनंदराव काढे यांना चक्कर येऊन खाली पडले असता शेतकऱ्यांस पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले गेले असता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता सदर शेतकरी ज्ञानेश्वर आनंदराव काढे यांना मुत्यु झाल्याचे सांगितले.
सदर मुत्तक शेतकऱ्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. व पारशिवनी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
मुत्यु झालेल्या शेतकरी ज्ञानेश्वर आनंदराव काढे यांचे कडे तीन एकर शेती आहे. ते बि. एस. सी. अँग्रीकचर झाले असल्याने आपल्या शेतात सुधारित पध्दतीने शेती करत आपल्या कुटुंबातील सदस्याचा सांभाळ करित होते.
त्यांच्या मागे पत्नी व एक मुलगा. एक मुलगी व वयोवृद्ध वडील आहे. त्यामुळे आता कुंटूबियाना साभाळणारा गेल्याने कुटुंबाला मोठा हादरा बसला आहे.
मुत्यृमुखी पडलेल्या शेतकरी कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.
सुधाकर मेंघर सदस्य जिल्हा नियोजन समिती यांनी मुत्यृमुखी पडलेल्या शेतकरी कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असी मागणी केली आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याचा लाभ व इतर शासकीय लाभ कुंटूबियाना मिळावे असे सुधाकर मेंघर सदस्य जिल्हा नियोजन समिती यांनी मागणी केली आहे.