बिग ब्रेकिंग…  — गांधीनगर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…  — देसाईगंज तालुक्यातील घटना… — आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात…

प्रितम जनबंधु

   संपादक 

        प्राप्त माहितीनुसार देसाईगंज तालुक्याच्या गांधीनगर येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खडबडजनक घटना आज २६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली असल्याने परीसरात शंका- कुशंकेला उधाण आले आहे. 

          सविस्तर वृत्त असे की, देसाईगंज तालुक्यातील आमगाव – देसाईगंज मुख्य मार्गावरील बैद्यनाथ कारखाना नजिक असलेल्या धोडी नाला जवळच आज सकाळी अंदाजे ७ वाजेच्या सुमारास मार्गावरून ये – जा करणाऱ्या काही नागरिकांना एक इसम झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

           सदर घटना ही वाऱ्यासारखी पसरली व घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यानुसार गांधीनगर येथील चक्रधर बनकर यांनी गळफास घेणाऱ्या व्यक्तीला ओळखले व गळफास घेणाऱ्या नरेश नामदेव पारधी (वय ३५ वर्ष) रा. गांधीनगर यांचे मोठे बंधू मारोती नामदेव पारधी यांना मोबाईल द्वारे सदर घटनेची माहिती दिली. त्यानुसार मारोती पारधी यांनी देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन सबब घटनेची माहीती दिली. 

           सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस प्रशासनास कळताच लगेच घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करण्यात आला व मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

              पुढील तपास ठाणेदार किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन करीत आहेत.      

        सदर तरुणाने गळफास का घेतला असावा, गळफास घेण्याचे नेमके कारण मात्र गुलदस्त्यात असून लवकरच प्रकरणाचा उलगडा होणार असल्याची चर्चा जनमाणसात सुरू आहे.