प्रितम जनबंधू
संपादक
“दखल न्यूज भारत परिवारातर्फे,होणारे “अधिवेशन,माहे एप्रिल २०२३ मध्ये घेण्याचे ठरविण्यात आले.
सदर होणाऱ्या अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते अॅचिव्हर्स अॅन्ड वेलविशर्स चे प्रकाशन थाटात संपन्न होणार आहे.
नियोजन बैठकीला दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके,संपादक ऋषी सहारे,संपादक प्रितम जनबंधू,आरमोरी शहर प्रतिनिधी सुनील नंदनवार उपस्थित होते.
अधिवेशनाच्या यशस्वी नियोजना संबधाने बैठकीमध्ये सविस्तर खुलासेवार चर्चा करण्यात आली.अधिवेशन यशस्वी करण्यासाठी दखल न्यूज भारतचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पाणसे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले जाणार आहे.
मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांच्या नियंत्रणाखाली अधिवेशन होणार असून अधिवेशनाचे आधारस्तंभ संपादक प्रा.ऋषी सहारे,संपादक प्रितम जनबंधू,संपादक जगदिश वेन्नम,आरमोरी शहर प्रतिनिधी सुनील नंदनवार,कार्यकारी संपादक दिनेश बनकर,जिल्हा प्रतिनिधी देवानंद जांभुळकर,जिल्हा प्रतिनिधी शतिष कडार्ला,आरमोरी तालुका प्रतिनिधी अश्विनी बोधेले,प्रतिनिधी प्रलय सहारे,अनिल ठवरे,कुरखेडा तालुका प्रतिनिधी राजेंद्र रामटेके,तालुका ग्रामीण प्रतिनिधी राकेश चव्हाण,पंकज चहांदे तालुका प्रतिनिधी देसाईंगंज-वडसा व गडचिरोली जिल्हा अंतर्गत सर्व प्रतिनिधी असणार आहेत.
तद्वतच अधिवेशनाचे सहकार्यवाहक सर्व संपादक,सर्व कार्यकारी संपादक,सर्व उपसंपादक,सर्व विभागीय प्रतिनिधी,सर्व जिल्हा प्रतिनिधी,सर्व प्रकारचे पदस्थ प्रतिनिधी असणार आहेत.
दखल न्यूज भारतचे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी दखल न्यूज भारतच्या अंतर्गत सर्वांनी मनःपुर्वक सहकार्य करावे असी अपेक्षा आहे.