कमलसिंह यादव
प्रतिनिधी
कन्हान,ता.२४ फेब्रुवारी
संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला क्रांती आघाडी,नागपूर जिल्हा तर्फे संस्थापक /सचिव,अजय धोपटे,कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे यांच्या अधिकार क्षेत्रातंर्गत
श्रीमती संगीता वांढरे यांंची कार्याध्यक्षा रामटेक विधानसभा क्षेत्र महीला आघाडी पदावर नियुक्ती करण्यात आली.तसेच सौ.जागृती पडोळे,अध्यक्ष कांद्री शहर (माजी सरपंच कांद्री )महीला आघाडी,सौ.दुर्गा सरोदे उपाध्यक्ष कांद्री महिला आघाडी,सौ.मीरा आंबीलडुके, सहसचिव कांद्री महिला आघाडी पदावर नियुक्ती केली.
तर मीना कळंबे यांची कन्हान शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तर सौ.सविता डांगरे यांची कन्हान शहर महिला आघाडीच्या सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली..
सर्व महिला भगिनींची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देताना,सौ प्रतिभा कुंभलकर,अध्यक्ष पारशिवनी तहसिल ( नगराध्यक्षा पारशिवनी, नगर परिषद महिला आघाडी,श्रीमती कामिनी हटवार,कार्याध्यक्ष मौदा तहसील महीला आघाडी,श्री अमोल साकोरे अध्यक्ष,रामटेक विधानसभा क्षेत्र युवा आघाडी, श्रीराम हटवार उपाध्यक्ष नागपूर ग्रामीण,श्री संजय बडवाई अध्यक्ष दक्षिण नागपूर युवा आघाडी,श्री अरविंद नरंड,श्री भगवान सरोदे,श्री.योगेश आखरे,आयुष् देशमुख,भगवान सरोदे,यशवंत आंबिलडुके,शुभम वांढरे, गांधी, सुरज कळंबे ,व इतर पदाधिकारी उपस्थित होते..