पुरस्काराने सन्मानित करण्यात येणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे होय.:- प्रकाश मेश्राम अध्यक्ष- मूकनायक फाऊंडेशन चिमूर…

      रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी…

      मूकनायक फाऊंडेशन चिमूरचे वतीने दिनांक 8 जानेवारी 2025 ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खापरी (धर्म) येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

       त्यात इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत एकूण 32 मूलांनी सहभाग घेतला होता.त्याचा बक्षीस वितरण सोहळा 26 जानेवारी गणराज्य दिनानिमित्त जी. प. प्राथ.शाळा खापरी धर्म येथे सकाळी 10 वाजता आयोजित कार्यक्रम घेण्यात आला.

           या कार्यक्रमाच्या अध्यक्ष निता मेश्राम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती खापरी (धर्म),प्रमुख पाहुणे श्रेया शेंडे सरपंच ग्राम पंचायत खापरी (धर्म),प्रदीप रणदिये अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती,पो.पा. मेश्राम,मूकनायक फाऊंडेशन चिमूर अध्यक्ष प्रकाश मेश्राम,मालुताई पिसे मॅडम मुख्यद्यापक,गभने मॅडम,उपसरपंच दीपक बुरडकर प्रकाश मेश्राम आदी मान्यवर मंचावर होते.

       पुरस्कार वितरण सोहळाच्या कार्यक्रमात मूकनायक फाऊंडेशन चिमूरचे अध्यक्ष प्रकाश मेश्राम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आराखडा व हस्ताक्षर हे केंद्र बिंदू असून त्यांच्या अंतर्गत असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देणे ही शाळे शिवाय आपली पालकांची सुद्धा जबाबदारी आहे,प्रोत्साहन दिल्याने मुलांचे सुप्त गुनात वाढ होते.

                तर आज स्पर्धेच्या युगात आपली मुले पुढे न्यायची असल्यास मुलात काय लपलेले आहे त्याचा शोध घेणे व त्याला चालना देणे ही काळाची गरज आहे असे आयोजित कार्यक्रमात मूकनायक फाऊंडेशन चिमूरचे अध्यक्ष प्रकाश मेश्राम हे बोलत होते.

     यावेळी कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – पिसे मॅडम,तर आभार गभने मॅडम यांनी मानले.