ॲग्रिस्टॅक प्रमाणपत्राचे वितरण… — सावली तहसिल कार्यालयाचा उपक्रम…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

         भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव दिनी (दि. 26) सावली तहसिल कार्यालय सावलीच्या तहसीलदार प्रांजली चिरडे यांच्या हस्ते शेतकरी विशिष्ट ओळखपत्र प्रमाणपत्राचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले.

          ॲग्रिस्टॅक ही योजना शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची माहिती आधारशी संलग्न केली जाते. या योजनेमुळे शेतकऱ्यांची माहिती आणि आकडेवारी कळण्यास मदत होते.

          या योजनेचा उद्देश सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी दिली जाते, या योजनेमुळे देशातील शेतकऱ्यांची अचूक माहिती उपलब्ध होते, या योजनेमुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळतो, डिजिटल पद्धतीचा शेतीमध्ये वापर व्हावा यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे.

          मंदाताई लाटेलवार, रोशन डोहने, शंकर गुंडावार, पल्लवी घडसे, मनोहर दुधे, वृंदा दुर्गे, राकेश मुप्पिडवार, रामभाऊ वनकर, मिलिंद गेडाम, विनोद मेश्राम, विजया गेडाम या एकरा शेतकऱ्यांच्या तहसीलदार प्रांजली चिरडे हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

             यावेळी तहसीलदार प्रांजली चिरडे, नायब तहसीलदार संदिप चांदेकर, अनमोल कांबळे, नायब तहसीलदार, किशोर मडावी आणि सावली तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.