ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : नंदलाल पाटील कापगते विद्यालय व उच्च कनिष्ठ महाविद्यालय साकोली येथे भारताच्या 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या उत्साहाने व देशभक्तीच्या चैतन्याने ध्वजस्तंभाचे पूजन व ध्वजारोहण विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती आर.बी.कापगते यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. हेमकृष्णजी कापगते (माजी आमदार साकोली), मुरलीधरजी गजापुरे (सेवानिवृत्त शिक्षक), प्रदीपजी गोमासे (सेवानिवृत्त प्राचार्य) संजयजी कापगते (सेवानिवृत्त प्राचार्य), डी.डी. कोसलकर (सेवानिवृत्त प्राचार्य), एस. एच. कापगते सर, एन.बी.नाकाडे सर, एम.व्ही. कापगते सर , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ऋग्वेदजी येवले, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष अविश कुमार भैसारे, उपाध्यक्ष डॉ.लेंडे, माता पालक संघाचे अध्यक्षा ज्योतीताई हौसलाल रहांगडाले, तनुजाताई हत्तीमारे, सीमाताई देशमुख इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी आर. एस. पी. च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पथसंचलनाचे प्रदर्शन करून प्रमुख अतिथींना मानवंदना देऊन प्रेक्षकांची मने जिंकली.
याप्रसंगी भंडारा जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये घडलेल्या दुःखत घटनेमध्ये मृत्यू झालेल्या निष्पाप कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले तसेच तंबाखू मुक्तीचे व कुष्ठरोग निर्मलनांची शपथ घेण्यात आली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर.बी.कापगते आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, संविधानाच्या अंमलबजावणीचे स्मरण करण्यासाठी आणि हा दिवस आपल्या हक्क व कर्तृत्व याची जाणीव करून देतो.
आपल्याला एक नवी दिशा व प्रेरणा देतो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांना आपल्या जीव गमवावा लागलेला आहे त्यामुळे त्यांना कधीच विसरून चालणार नाही त्यांना नेहमी स्मरणात ठेवले पाहिजे, आपला देश जगात आणखी महान होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे मौलिक विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन आर.बी.कापगते सर व के.जी.लोथे सर यांनी केले. सरते शेवटी कार्यक्रमाचे समारोप प्रसाद वाटप करून वंदे मातरम या गीताने करण्यात आले.