ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले रक्तदान… — चिमूर पदाधिकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

      ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन चे अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे यांचा जन्मदिन दि.24 जानेवारीला केमिस्ट मंडळी दरवर्षी साजरा करत असतात.

           या वर्षी आप्पासाहेबांच्या 75 व्या जन्मदिना प्रित्यर्थ संपूर्ण भारतात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते‌.त्याचाच एक भाग म्हणून चिमूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असो.च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

                या रक्तदान शिबिराचे उद्घघाटन आपल्या सर्वांचे परिचित गुरुदेव भक्त प्रकाशजी जयस्वाल यांच्या हस्ते पार पडले.

         या शिबिरामध्ये एकूण 42 मंडळींनी प्रत्यक्ष शिबिर स्थळी येऊन नोंद केली.त्यात 28 रक्तदानदाते रक्तदान करण्यास पात्र ठरले.या 28 रक्तदात्यानी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले.

        रक्तदान शिबिर दुर्गा माता मंदिर,(वडाळा पैकु)चिमूर इथे सकाळी 11 ते 4 या वेळेत घेण्यात आले.डॉ.हेडगेवार रक्त संकलन केंद्र नागपूर यांच्या सौजन्याने हे शिबिर घेण्यात आले.

             चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट यांच्या मार्गदर्शनात चिमूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असो.ने हा उपक्रम राबविला.

 

         चिमूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असो.चे तालुका अध्यक्ष अजयभाऊ चौधरी तसेच तालुका सचिव स्नेहदिप खोब्रागडे यांच्या पुढाकारातून ह्या रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

      या शिबिरा प्रसंगी गुरुकूंज कॉलनीतील दुर्गा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रमेशजी कराळे,ट्रस्टचे सचिव चंद्रशेखर नन्नावरे,उल्हासजी पवार,प्रशांतजी तडस तसेच चिमूर तालुक्यातील केमिस्ट मंडळींनी आपले सामाजिक भान जपत या शिबीर प्रसंगी मोलाचे सहकार्य केले .

        प्रत्येक रक्तदात्याना डॉ. हेडगेवार रक्त संकलन केंद्र नागपूर च्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. चिमूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असो.कडून नाश्ता,चहा,बिस्कीट,एनर्जी ड्रिंक तसेच केळीचे वाटप रक्तदात्याना करण्यात आले.

       ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे यांचा जन्मदिन दि.24 जानेवारीला केमिस्ट मंडळी दरवर्षी साजरा करत असतात.