प्रजासत्ताक चे भवितव्य,भाग – 2

     स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय ही मानवी मूल्य ही मूल्य फक्त लोकशाही सत्तेत आणि समतेच्या व्यवस्थेत च व्यक्तीस मिळू शकतात.ही मूल्य हुकमशहीत किंवा गुलामीत आणि विषमतेच्या व्यवस्थेत व्यक्तीस मिळू शकत नाहीत.म्हणून अनेक देशात लोकशाहीचे लढे चालू आहेत.लोकशाही क्रांती पण घडून आल्या.

        हुकुमशाही संपून लोकशाही आली याचा अर्थ फक्त राजकीय बदल किंवा राजकीय क्रांती झाली असे होते.राजकीय क्रांती,परिवर्तन म्हणजे केवळ सत्तेत बद्दल एव्हढेच आहे.पण जर नागरिकांना सत्ता बदलण्याचा हक्क मिळाला,आनी नागरिकांनी आपले प्रतिनिधी निवडून दिले,आणि ते प्रतिनिधी परत हुकुमशाही आनु शकतात.जर ते स्वातंत्र्य समता बंधुभव न्याय या विचाराचे नसतील,म्हणजेच हुकुमशाही असमानता उच्चनीच वरिष्ठ कनिष्ठ भेदभाव या विचाराचे असतील, त्यांचेत बंधुभाव नसेल,ते अन्यायी असतील तर असे निवडून गेलेले नक्कीच हुकुमशाही परत प्रस्थापित करतील,हे नक्कीच.म्हणून सत्ता बदलणे म्हणजे राजकीय क्रांती करून उपयोगाचे नाही,तर ही राजकीय क्रांती सफल व्हायची असेल तर स्वातंत्र्य समता बंधुता न्याय लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्षता या भारतीय संविधानाचा धेय्यवाद जोपासणाऱ्या उमेदवार आणि पक्षासच निवडून द्यावे लागेल,याचे भान मतदारांना ठेवावे लागेल.हे भान नसेल तर सत्तंतरे होतच राहतील.

     केवळ राजकीय क्रांती किंवा बदल म्हणजेच सत्ता बदलून उपयोगाचे नाही तर व्यवस्था पण बदलावी लागेल.स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय ही मानवी मूल्य आणि समाजवाद लोकशाही धर्मनिरपेक्षता ही सामाजिक मूल्य जोपासणारी आणि प्रस्थापित करणारी सत्ता पाहिजे.अशीच सत्ता ही विषमतावादी व्यवस्था नष्ट करून समतावादी व्यवस्था प्रस्थापित करू शकते.आणि एकदा का समतेवर आधारित आर्थिक सामाजिक व्यवस्था स्थापन झाली की मग या व्यवस्थेत मानवी मूल्य आणि सामाजिक मूल्य स्थिर राहतात.त्यांची रुजवण होते,वाढ होते.त्यांचा वटवृक्ष बनतो.विषमतेच्या वातावरणात परिस्थितीत व्यवस्थेत समतेची स्वातंत्र्याची बंधुटेची न्यायाची बीजे कधीच रुजू शकत नसतात.विषमता म्हणजे खडकाची जमीनच होय.

    म्हणूनच राजकीय लोकशाहीत मतदार उमेदवार सत्ता आणि व्यवस्था हे चार फॅक्टर ,यांचा रोल भूमिका निर्णय महत्त्वाचा असतो.यांची भूमिका निर्माण करण्याचे काम कार्यकर्ते (राजकीय सामाजिक धार्मिक) करीत असतात.विचारवंत,कलाकार,साहित्यिकआणि इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया पण लोकमत निर्माण चे कार्य करीत असतात.यांचेवर च प्रजासत्ताक चे भवितव्य अवलंबून आहे.

        लेखक : दत्ता तुमवाड

          सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 26 जानेवारी प्रजासत्ताकदिन 2025

                  फोन : 9420912209.