75 वर्षाचा संविधानिक अंमलबजावणीचा आणि मतदार जागृतीचा लेखाजोखा भारताच्या राजकीय स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांपूर्वी देशाचा लोकशाही राज्यपद्धतीचा प्रवास सुरु झाला.
तत्कालीन क्रांतिकारक व महापुरुषांनी विविध जाती आणि धर्मात विभागलेल्या भारताला संविधानाच्या एका धाग्यात बांधण्याचे महान कार्य संविधानसभेच्या मसुदा समितीने केले.
ही बांधणी करत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तत्कालीन संविधानविरोधी शक्तीने नामोहरम करण्याची एकही संधी सोडली नाही.अनेक मार्गाने त्यांना घेरण्याचा प्रयत्न केल्या गेला.परंतू निसर्गनियमावर आधारित असलेली विवेकवादी + विज्ञानवादी = मानवतावादी दृष्टिकोन असणाऱ्या शक्तीचाच विजय होत असतो,हा प्राचीन जगाचा इतिहास असल्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विशाल दृष्टिकोनाचाच विजय होऊन संविधानविरोधी शक्तीचा पराभव झाला!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण सजीवसृष्टीचे कल्याण निर्जीव सृष्टीच्या सहाय्याने कसे साधता येईल याचा सारासार विचार करुनच त्यांनी या……
भारताच्या संविधानाची निर्मिती केली….
दुसऱ्या महायुद्धासारखे महाभयंकर जागतिक अणूयुद्ध पुन्हा कधीही होऊ नये आणि संपूर्ण जग लोकशाहीवादी होण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची(United Nations Organization ) स्थापना अमेरिका आणि इंग्लंडच्या पुढाकाराने करण्यात आली. याच( UNO ) युनोने पुढे 10 डिसेंबर 1948 रोजी जागतिक मानवी हक्काचा 30 कलमांचा जाहीरनामा( अप्रत्यक्षरित्या भारताच्या संविधानातून अधोरेखित झालेल्या ) घोषित करुन लोकशाहीच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला…..
म्हणूनच भारताचे संविधान हे भारताला प्रदान करण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले होते. परंतू एवढी मोठी विशाल देणगी प्रदान करणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विशाल दृष्टिकोनाचा लाभ देशाला करुन देण्यात आणि तीची 100% अंमलबजावणी करण्यात संविधानविरोधी शक्तीने आडकाठी घातली नसती तर कदाचित…..
या देशाला आज 75 वर्षांनंतर ज्या समस्या भेडसावत आहेत.त्यांचा जन्म सुद्धा झाला नसता…!
संविधान सभेतील 25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या शेवटच्या भाषणात एक महत्वाचा मुद्दा मांडताना ते भविष्यातील भारताला एक सूचक इशारा देतात की, ” आम्ही येत्या 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र आणि सार्वभौम अशा भारतात प्रवेश करत आहोत. यापूर्वी आम्ही कधी स्वतंत्र नव्हतो असं नाही.तर ते स्वातंत्र्य आम्ही का गमावून बसलो हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून 26 जानेवारी रोजी मिळणारे स्वातंत्र्य हे जर का आम्ही गमावून बसलो तर ते आम्ही पुन्हा कधीही मिळवू शकणार नाही. ” या सूचक धोक्याचा इशारा आम्ही भारताचे लोकं…..
का?...कधी?
समजून घेऊन जागृत होणार आहोत का होणारच नाहीत…..
या प्रश्नाचे उत्तर स्वतःला भारताचे नागरिक समजणाऱ्या, स्वतः शिक्षक,प्राध्यापक,डॉक्टर,विद्वान समजणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाने शोधायलाच हवे!
अन्यथा…….
अन्यायग्रस्त,अल्पसंख्यांक आणि संविधानवादी विचारसरणीच्या समाजाने पुढाकार घेऊन,निर्भीड आणि परखड पत्रकारांनी या समाजाचे वैचारिक नेतृत्व स्वीकारून,त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून एका मोठ्या संविधानिक आणि लोकशाही मूल्ये असलेल्या स्वातंत्र्य,समानता,आणि बंधुता तत्वाच्या अविष्कारितेसाठी तन – मन – धनाने व त्याग आणि संघर्षाने समर्पित होऊन संविधानिक क्रांतीसाठीची निदान उत्क्रांतीची सुरुवात या 26 जानेवारीपासून करावीच लागेल.
तरच भविष्यातील जीविताचा आशावाद जिवंत असेल.
गेल्या 75 वर्षात संविधानविरोधी शक्तीने जशी संधी मिळेल तशी डोके वर काढण्याचा प्रयत्न करत आलेली आहे.परंतू ,गेल्या 2014 पासून कोरोनाच्या गतीने ही शक्ती उफाळून येत आहे.
यामध्ये पडद्यावर एक नॉन बायलॉजीकल आणि तडीपार प्राणी आहेत. आणि त्यांच्यामागे RSS आणि भाजप या राजकीय पक्षाने संपूर्ण संविधानिक संस्थांना साम,दाम,दंड आणि भेदाच्या कूटनितीचे गुलाम बनवून नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत.
अशा कठीण काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या धोक्याच्या इशाऱ्याचा अर्थ काळानुसार तपासून करुन तशी उत्क्रांतीची सुरुवात करायला कोणती अडचण आहे?
आमच्या ( बोटावर मोजण्या इतक्या टक्केवारी असलेल्या लोकांच्या ) अत्यावश्यक, आवश्यक,सुखाच्या,चैनीच्या,विलासाच्या गरजा भागलेल्या असतांना आम्हाला कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहेत?
केवळ ” मी ” पणाचा किंवा नाशवन्त आणि मृत्यूनंतर सोबत घेऊन न जाता येणाऱ्या संपतीचा कोरडा अहंकार आडवा येत आहे का?
असे असेल तर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तुमच्यासारखा विचार केला असता तर………
काय झाले असते?
त्यांनी स्वतःचे 65 वर्षाचे संपूर्ण आयुष्य हे आमच्यासाठी खर्च केलेले असतांना त्यांचा त्याग आणि संघर्ष 75 वर्षात समजून घेण्यात जर आम्ही कमी पडलो,तर यात नुकसान माझेच आहे,माझ्याच लेकराचे,नातवाचे,पुढच्या पिढीचे आहे.हे ठाऊक असूनही आम्ही जर काहीही न करता केवळ मौन धारण करुन गप्प बसून राहिलो.तर येणाऱ्या भावी पिढीचे खुनी आणि गुन्हेगार आम्ही ठरू…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारतात आपण प्रवेश करुन 75 वर्षे आज पूर्ण झालेली आहेत.आणि ते स्वातंत्र्य गमावून बसण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे!
ती वेळ कशी टाळणार?
तीचा सामना कसा करणार?
त्या संविधानविरोधी शक्तीला कसे जगाच्या वेशिवर टांगणार?
ती संविधानविरोधी शक्ती म्हणजे मनुस्मृती……
— मनुस्मृती म्हणजे आताचे EVM +VVPAT होय!—
सोबतच संविधानिक मूलभूत हक्काचे संरक्षण आणि तीची जागृती व अविष्कार. यांच्याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही.
कारण….
आमच्या ( आम्ही भारताचे लोकं ) मूलभूत हक्कातील अती उच्चं हक्काचं टोक असलेल्या मताचा अधिकार जो आमच्या प्राणापेक्षाही मोलाचा आहे. त्याच मताच्या जागृतीचा आजचा दिवस म्हणजेच “मतदार दिवस ” आहे….
त्याच मतदान अंमलबजावणी असलेल्या संविधान अंमलबजावणीचा दिवस अर्थात प्रजासत्ताक दिन हा उद्याच 26 जानेवारी अमृत महोत्सवी वर्षे पूर्ण झालेले आहे.
तेंव्हा याच मूलभूत हक्काचे संरक्षण करण्यासाठीच शेवटच्या श्वासापर्यंत लढूया….
तेंव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही या देशाचे नागरिक बनू…..
*****