आज प्रजासत्ताक दिवस म्हणजे राष्ट्रीय लोकशाही उत्सव दिन,”त्यानिमित्ताने,… — धर्मांधतेला अनुसरून आम्ही आमचेच अधिकार नष्ट करु लागलोय,यापेक्षा आमचा दुसरा पराभव कोणता असू शकतो?

संपादकीय

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

            सन २६ जानेवारी १९५० ला पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करतांना या देशातील नागरिक,”भारतीय संविधानातंर्गत,स्वतःच्या हक्काला समजून घेतील आणि स्वतःला सर्व स्तरांवर उन्नत करतील असे युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तात्कालिन राष्ट्र धुरिणांना वाटत होते.

        तद्वतच धर्मांधतेला बळी न पडता समानतेला समजून घेत जातिभेदांच्या चौकटी मोडून काढीत,” समता,स्वातंत्र्य,बंधुत्व,न्याय,या संकल्पनेला अंगीकृत करणार असा आशावाद त्यांना होता‌.

       म्हणूनच…

संविधानाच्या प्रास्ताविकेला अनुसरून..

        — “आम्ही,भारताचे लोक,भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस;” सामाजिक,आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रध्दा,व उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता;

     निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपुर्वक निर्धार करून;

    आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी या द्वारे हे संविधान अंगीकृत आणि आधीनियमित करुन स्वतःप्रत अर्पण करत आहोत.–

***

        वरील प्रमाणे,”किती मोठा विशाल दूरदृष्टीकोण देशातील नागरिकांप्रती तात्कालिन राष्ट्र धुरिणांचा होता,हे अजून पर्यंत देशातील बहुसंख्य-बहुजन समाजातील नागरिकांच्या लक्षात आले नाही,हे या देशातील बहुसंख्य-बहुजन समाजातील नागरिकांचे दुर्भाग्यच!..

            वरील संकल्पनेला अनुसरून,”समाजमन व देशमन,”तात्कालिन राष्ट्र धुरिणांना,”परिवर्तन व्यवस्थे अंतर्गत बदल घडवून आणीत, अनंत काळापर्यंत देशातील सर्व नागरिकांत समानतातंर्गत कार्यपद्धत बघायची होती.

        तद्वतच देशात एकमेकांप्रती बंधुत्व जोपासणारा आणि,” सातत्याने न्याय भुमिका वटविणारा समाज घडविण्याचा त्यांचा दूरदृष्टीकोण,”स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मुल्य जोपासणाऱ्या नागरिकांत होता.अर्थात देशातील प्रत्येक नागरिक हा आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,औधोगिक दृष्ट्या प्रगत व उन्नत हवा होता.

          मात्र,उन्नत व प्रगत समाज नाकारत,”लोकशाहीला मारक म्हणजे देशातील नागरिकांना मारक,”असलेला,”हिंदू – मुस्लिम वाद,”विश्व हिंदू परिषद,बजरंग दल,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,भाजपानी,जाणिवपूर्वक उकरून काढला आहे असे म्हणायचे काय?.

         कारण हिंदू – मुस्लिम वाद चिघळवल्याशिवाय देशातील ज्ञानी-अज्ञानी नागरिकांचे डोके भडकले जाणार नाही व वैचारिक दृष्ट्या भ्रमिष्ट केल्याशिवाय त्यांना आपल्या बाजूने केल्या जाऊ शकत नाही हे हिंदू संघटना,आर.एस.एस‌. आणि भाजपाच्या शिर्ष नेतृत्वाला चांगल्या प्रकारे माहिती होते.

         आणि म्हणूनच हिंदू संघटना,भाजपा व आर.एस.एस.ने देशाच्या धर्मनिरपेक्षतेला व सार्वभौमत्वाला नाकारुन,”हिंदू या धर्म संकल्पनेला महत्व देणे सुरू केले.या हिंदू धर्म संकल्पनेतच विषमतावादाला अनुसरून देशातील लोकशाहीचा म्हणजे देशातील नागरिकांचा मुडदा दडलेला होता किंवा आहे हे या देशातील बहुसंख्य-बहुजन नागरिकांना अजूनही कळलेले दिसत नाही.

          या देशातील ब्राह्मण व ब्राम्हणवादी,”हिंदू म्हणजे नेमके काय? याचा खरा अर्थ सांगायला तयार नाहीत किंवा पुढे आणायला तयार नाहीत.

         मात्र,भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या सार्वजनिक प्रश्नांचे उत्तर देताना आर.एस‌.एस.प्रमुख मोहन भागवत व टिव्ही चॅनल अंतर्गत हिंदू या शब्दाच्या परिभाषेचे स्पष्टीकरण करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले होते,”की,” हिंदू हा धर्म नसून,जिवन जगण्याची कार्यपद्धत आहे‌.

              मग?आर.एस‌.एस.प्रमुख मोहन भागवत व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार “हिंदू,हा धर्म नाही तर,”हिंदू, शब्दांतंर्गत जिवन जगण्याची कार्यपद्धत आहे‌‌.

         मग नेमकी कार्यपद्धत काय आहे? हे कुणालाच माहीत नसेल तर गुलदस्त्यातील न दरवळणारा तो अवास्तव सुगंध आहे?हे या देशातील बहुसंख्य-बहुजन नागरिकांना केव्हा कळेल? हेच कळायला मार्ग नाही.

         परत्वे,भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी,”हिंदू,हा शब्द भारतातील कुठल्याच धर्म ग्रंथांत नसल्याचे सार्वजनिक सांगितले आहे व या देशातील ब्राह्मणांना आणि ब्राह्मणवाद्यांना खुलेआम चॅलेंज दिले आहे की,”हिंदू,हा शब्द भारतातील वेद,पुरान,रामायण,महाभारत,व इतर कुठल्याही धर्म ग्रंथात असल्याचे सिध्द करून दाखवावे.

            हिंदू हा शब्द भारतीय संस्कृती मधील नसेल तर हा शब्द भारतातील नागरिकांना,”उद्देशून, वारंवार बोलण्याचे मनसुबे कोणत्या उदेशांनी? आणि का म्हणून? तद्वतच या शब्दाचा अर्थ काय? 

       “यावर,देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी, हितासाठी व संवर्धनासाठी सखोल चर्चा झाली पाहिजे,या अनुषंगाने ब्राह्मण व ब्राम्हणवादी पुढे येतील काय?

              “हिंदू म्हणजे गुलाम,असे मी दोन वक्त्यांचे मार्गदर्शनातून ऐकले आहे,”यात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव तथा प्रशिध्द इतिहासकार प्रा.विलास खरात यांचा समावेश आहे.दुसरे दस्तुरखुद्द भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व जगविख्यात वैचारिक तज्ञ वामन मेश्राम आहेत.

         खरोखरच,”हिंदू म्हणजे गुलाम,असा अर्थ होत असेल तर या देशातील,…”एससी,एसटी, ओबीसी,एनटी,व्हिजेन्टी, अल्पसंख्याक,मागासवर्गीय… या बहुसंख्य बहुजन समाजातील नागरिकांना,”ब्राह्मण,ब्राह्मणवादी, सनातनी,यांच्याद्वारे व “विश्व हिंदू परिषद,बजरंग दल,आर.एस.एस.संघटनेच्या वरिष्ठांकडून, नेत्यांकडून,लोकांकडून आणि भाजपाच्या शिर्ष नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून का म्हणून गुलाम म्हणून संबोधले जात आहे?हे सुद्धा लवकरात लवकर देशातील नागरिकांसमोर आले पाहिजे.

              आर.एस.एस.प्रमुख मोहन भागवत व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार,”हिंदू, हा धर्म नाही,”तर,मग,”हिंदू, हा धर्म आहे,हे ब्राह्मण व ब्राम्हणवादी आणि त्यांच्या सर्व संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते का म्हणून वारंवार म्हणत सुटले आहेत? हे सुद्धा स्पष्ट झाले पाहिजे.

          कारण हिंदू या शब्दांमुळे देशांतर्गत देव,देवळे,धर्म,या बाबत वाद उफाळून आणला गेला आहे व या वादातंर्गत देशातील नागरिक भरडल्या जात आहेत,नव्हे तर भरडत ठेवण्याची परंपरा सुरु केल्या गेली आहे आणि या परंपरेला अनुसरून काही अमान्य तत्वज्ञान थोपविण्यासाठी सर्रास शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला जात आहे.

           याचबरोबर या वादाचे मुळ कारण म्हणजे बहुसंख्य-बहुजन समाज या देशाचा सत्ताधारी अजिबात बनू नये यासाठी ब्राह्मणवाद्यांची धडपड असल्याचे दिसून येते आहे.

    उदा :-

           २१ नोव्हेंबर १९९२ ला ओबीसी समाजाच्या संपूर्ण अस्तित्वाला मान्य न करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला.

    हा निर्णय चार प्रकारचा होता…

     १) ओबीसी समाजात ३ हजार ७४३ जाती असताना १ हजार ९०० जातींनाच सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले व उर्वरित १८४३ जातींना ओबीसी बाह्य ठरविले.(ओबीसी समाजाचे तुकडे केले.)

      २) ५२ टक्के आरक्षणापैकी २७ टक्के आरक्षण लागू केले.(१ हजार ९०० जातीला अनुसरून‌)

     ३) शासकीय व प्रशासनीक धोरणाला अनुसरून प्रत्यक्ष १४ टक्के आरक्षण लागू केले.

     ४) घटनेत शब्दावली नसणारी नाॅन क्रिमिनलची अट घातली गेली..

        वरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला न्यायसंगत म्हणायचे?,”कि,समाजद्रोही म्हणायचे वा राजद्रोही म्हणायचे? हेच अजून पर्यंत माझ्यासह देशातील नागरिकांना कळले नाही.

           ओबीसी समाजाची बलाढ्य अशी सामुहिक शक्ती नाकारणारा सर्वोच्च न्यायालयाचा २१ नोव्हेंबर १९९२ ला निर्णय आला आणि अवघ्या १५ दिवसांनी म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनीच,”बाबरी मशीद,पाडण्याची झालेली घाई,यात षडयंत्रांच्या घडामोडी आहेत काय?यावर कुणी भाष्य करायला तयार नाही..

          कारण बाबरी मशीद पाडण्यासाठी सर्व ब्राह्मणवादी संघटनांनी,(मी हिंदू संघटना म्हणणार नाही.)महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवसच का म्हणून निवडला?

          मात्र,ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजासाठी व हिंदू महिलांच्या हक्कांसाठी १९५१ ला,”कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला,हा राजीनामा व सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ओबीसी समाजाला कळू नये याची दक्षता ब्राह्मणवादाचे पुरस्कर्ते असलेल्या व स्वतःला हिंदू संघटना म्हणवणाऱ्या ओबीसीद्रोहींनी घेतल्याचे दिसून येते आहे.

              ओबीसी समाज घटकातील नागरिकांना धर्म,देव आणि देवळे याबाबत एनकेन प्रकारे भरकटत ठेवले तर बाकीचा समाज हा देशाची राज्यसत्ता हस्तगत करु शकत नाही हे मनुवाद्यांनी(ब्राह्मणवाद्यांनी) ओळखले होते.आणि याच ओळखण्यात त्यांनी,”बहुजन समाजाला विशेषतः ओबीसी समाजाला त्याच्या हक्काप्रती कळू दिले नाही,एवढे भयानक षडयंत्र केल्या गेले.

       तरीही.‌‌..

         प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्षी सुध्दा ओबीसी,एससी, एसटी,अल्पसंख्याक,समाज स्वतःला व स्वतःच्या हक्काला आणि स्वतःच्या संत-महापुरुषांना ओळखण्यात अपयशी ठरला आहे,याला काय म्हणावे?..

             भारत देशात धर्म वादाने देशातील नागरिकांचे आर्थिक,शैक्षणिक,राजकीय, सांस्कृतिक,औधोगीक व सामाजिक,वाटोळे केले असताना,या देशातील लोकप्रतिनिधी म्हणजेच खासदार व आमदार हे लोकविरोधी असलेल्या स्व पक्षांच्या विचारधारेंचे भजनपुजन करण्यातच मग्न आहेत? याला जनसेवक म्हणायचे काय?आणि जनसेवा म्हणायची काय?

           ज्या लोकप्रतिनिधींना,”भारतीय संविधानातंर्गत,प्रतिनिधीत्वाची व्याख्या कळत नाही ते लोकप्रतिनिधी लोकहिताचे व देशहिताचे काय कर्तव्य पार पाडणार?

             लोकहित व देशहित बाजूला सारून पक्षाच्या संकुचित व धर्मांध विचारधारे प्रमाणे काम करणारे व कर्तव्य पार पाडणारे “लोकप्रतिनिधी,”भारतीय संविधानाला अजिबात मान्य नाही…

           कारण भारतीय लोकशाहीला,”धर्मांध्य विचारधारेला अनुसरून नशांद्य लोकप्रतिनिधी नकोत तर धर्मनिरपेक्षतेचे रक्षण करणारे व सार्वभौमत्वाला जपणारे लोकप्रतिनिधी अपेक्षित आहेत‌.जे देशातील सर्व नागरिकांचे सदासर्वदा रक्षण करतील…

       “आज प्रजासत्ताक दिन आहे,देशात राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जातो‌.परंतू देशातील नागरिकांना प्रजासत्ताक म्हणजे नेमके काय?हेच अजून पर्यंत कळले नाही,हे या देशाचे दुर्भाग्य नाही काय?

            देशातील नागरिकांनी लोकशाही अंतर्गत स्वतःच्या हक्काला व हक्कातंर्गत स्वतःच्या स्वाभिमानाला,स्वावलंबनाला वेळीच ओळखले नाही तर धर्मांध राजकारणी देशातील नागरिकांचे व देशाचे वाटोळे केले शिवाय स्वस्थ बसणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

        आणि वाटोळे झालेच तर हे या देशातील नागरिकांचे स्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या काळातील पराभवी दुर्भाग्य असेल..‌

****

“देशातील सर्व बंधूभगिनींना…‌

    प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने…

— दखल न्यूज भारत वेब पोर्टल परिवारातर्फे…

          “मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा!..

🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪