प्रितम जनबंधु
संपादक
गडचिरोली :- येथील शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व विद्यार्थी आणि शिक्षक, तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ न घेण्याची शपथ घेतली. यावेळी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याशिवाय खासदार यांचे जनसंपर्क कार्यालयात व साईकृपा पतसंस्थेत खा.नेते यांनी ध्वजारोहण करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रॅलीत सहभाग घेतला.
शिवकृपा महाविद्यालयातील प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.पी. दुर्गम, प्रा.झाडे, प्रा.मोहरले, प्रा.रोहनकर, प्रा.विश्वास, प्रा.वाटेकर, शेटे बाबु, प्रविण कांबळे, यांच्यासह शिक्षकतेकर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
खा. अशोक नेते यांच्या चामोर्शी मार्गावरील जनसंपर्क कार्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमाला आ. डॅा. देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, योगिता पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष दामोधर अरिगेला, सुधाकर येनगंदलवार, अनिल पोहनकर, अनिल कुनघाडकर, भारत खटी, रंजिता कोडाप, मुक्तेश्वर काटवे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. साईकृपा पतसंस्थेतील कार्यक्रमाला महादेव पिंपळशेडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत खा.अशोक नेते यांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला. यावेळी लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष दामोधर अरिगेला तसेच मोठ्या संख्येने अभाविपचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.