
— वाचविलेस तू आम्हाला नरसंहारी सीरिया-इराक होण्यापासून !
होऊ दिला नाहीस आमचा पाकिस्तान नि रशिया !!
— व्यक्ती विकासाला वाव देऊन दिलीस प्रत्येकाला सर्वांगीण विकासाची संधी !
नेलेस देशाला सर्वच क्षेत्रात एकविसाव्या शतकाच्या विकास पथावर !!
— तुझ्याच नियमांमुळे इथे रंक ही पोहचतात सर्वोच्च पदापर्यंत !
नि गुणा-गोविंदाने नांदतात विविध जाती-धर्म-पंथाचे लोक !!
— तु आहेस आमचा प्राण आणि सन्मान!
तुझ्यामूळे टिकून आहे जगातील सर्वात मोठे संसदीय लोकशाहीवादी भारत राष्ट्र महान!!
— तु घडविलेस भारतीय प्रजासत्ताक आणि जगात ठरलास लोकशाहीचा दीपस्तंभ !
आजच्या मंगल दिनी संविधान आणि संविधान निर्मात्यांना शत-शत प्रणाम !!