डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
आज दिनांक 26/1/2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगढ सीमेलगत असलेले गडचिरोली पोलिस दलाचे सर्वात दूरचे उपपोस्ट लाहेरी या ठिकाणी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी लाहेरी येथे भेट देऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला.
याप्रसंगी लाहेरी हद्दीतील आदिवासी बांधव तसेच आश्रम शाळा व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक यांनी या भागातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व शालेय विद्यार्थ्यांना मिठाई व चाॅकलेट वाटप केले तसेच लाहेरी येथील जवानांचे मनोबल वाढविले.
कार्यक्रमास अपर पो.अधीक्षक श्री अनुज तारे( अभियान), अपर पो.अधीक्षक श्री. कुमार चिंता (प्रशासन), अपर पो.अधीक्षक श्री. यतिश देशमुख , असिस्टंट कमांडंट श्री. तरुणकुमार तसेच लाहेरी चे सरपंच राजेश्वरी बोगामी, व इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभारी अधिकारी लाहेरी पोउपनी श्री. महादेव भालेराव, पोउपनि/सचिन सरकटे, पोउपनी /संतोष काजले व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.