आमदार रामभाऊ सातपुते यांची उद्योजक सागर इंगळे यांच्या लक्ष्मी नरसिंह डेव्हलपर्स ऑफिसला सदिच्छा भेट.. — प्रामाणिक व विश्वासू व्यक्तींच्या भेटीला येणे आवश्यक..

बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

         निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथे लक्ष्मी नरसिंहाची महापूजा व दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत पत्नी अमृता ताई फडणवीस व माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते आले आसता त्यांनी लक्ष्मी नरसिंहाची मनोभावाने पूजा व दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

         संगम तालुका माळशिरस येथील उद्योजक व प्रगतशील बागायतदार,गोरगरिबांचे कैवारी, जाणता राजा,सागर इंगळे यांच्या ऑफिसला भेट देण्यासाठी माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते यांनी सदिच्छा भेट दिली.

         या निमित्त आमदार रामभाऊ सातपुते बोलत आसताना म्हणाले की,सागर इंगळे साहेब व माझे अतिशय जवळकीचे आणि मैत्रीचे नाते आहे.अतिशय विश्वासू व प्रामाणिकपणा आणि माणुसकी हिच त्यांच्या जीवनातील खरी ओळख आहे.कोणत्याही कामासाठी त्यांच्या पाठीशी सातत्याने ऊभा राहीन असे भेटी प्रसंगी गौरवोद्गार 

आमदार रामभाऊ सातपुते यांनी सागर इंगळे यांच्या बाबतीत काढले.

          लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीत लक्ष्मी नरसिंह डेव्हलपर ऑफिस आसून या ठिकाणी आनेक नामांकित पहिलवान व पुणे,सोलापूर,सातारा,या सर्वच जिल्ह्यातील मित्र परिवाराचा सागर इंगळे साहेब यांचा जनसंपर्क आसल्यामुळे नेहमीच सर्वच मित्र प्रेमींची उपस्थिती या ऑफिसला आसते.

         तसेच आमदार रामभाऊ सातपुते यांच्या समवेत निरा नरसिंहपूरचे माजी सरपंच नरहरी काळे,शिवसेना शिंदे गट तालुका अध्यक्ष होणारे,माजी सरपंच आण्णासाहेब काळे,माजी सरपंच विलास ताटे देशमुख,माजी सरपंच संतोष मोरे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दशरथ राऊत यांच्यासह सागर इंगळे व मित्र परिवार यावेळी उपस्थित होते..