जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्वपूर्ण पत्रास केव्हा महत्व देणार?.. — संवर्ग विकास अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा व निष्क्रीयतेचा ठपका का म्हणून ठेवला जात नाही?:- गावकरी..

   रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

           चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा डोंगरगांव पो, जामगांव,येथील सरपंच व पदाधिकाऱ्यांनी फेरफार करून आपल्या व आपल्या परिवाराच्या नावाने जागा हडप केली.

           त्यामुळे त्यांना पदावरून हटविणे,कर आकारणी रद्द करणे,अतिक्रमण कमी करणे,या पत्र क्रमांक जमिन/का. ४/स.अ.भु.अ./कावि/११८६/२०२३ दि. २४/०९/२०२३ चे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या पत्राला अनुसरून चिमूर पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर काम करणाऱ्या सरपंच व सदस्यांवर अजूनपर्यंत कारवाही केली नाही.

      यामुळे सदर डोंगरगावचे ग्रामवासीय अत्यंत नाराजीत असुन त्वरीत कारवाही व्हावी अशी मागणी करीत आहेत.

       या संदर्भात अनेक तक्रारी झाल्या असुन त्याची चौकशी पण झालेली आहे.याचबरोबर संवर्ग विकास अधिकारी चिमुर हे बेजबाबदार सरपंच व सदस्यांवर कारवाही करण्यास टाळाटाळ करीत आहेत. 

       यामुळे चिमूर पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांवर निष्क्रीयतेचा व हलगर्जीपणाचा ठपका का ठेवण्यात येवु नये?असे मत अर्जदार निलकंठ नन्नावरे व ग्रामस्थांनचे आहे.