धानोरा /भाविक करमनकर
25 जानेवारी 2023 रोजी पोलीस मदत केंद्र येरकड व दिव्यांग संघटना धानोरा यांच्या सहकार्याने दिव्यांगासाठी सहाय्यक उपकरणचे मोफत वाटप शिबिर पोलीस मदत केंद्र येरकड येथे पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे व उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव धानोरा उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ कारवाफा यांचे मार्गदर्शनात दिव्यांग व्यक्तींना गरजेनुसार साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठी विविध शासकीय योजना ची माहिती देण्यात आली तसेच यावेळी परिसरातील दिव्यांग व्यक्तीची अडचणीचे निराकरण करण्यासाठी पोलीस मदत केंद्र येरकडं प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आकाश ठाकरे यांच्या संकल्पनेतून पोमके हद्दीतील व धानोरा व विभागीय अंतर्गत येणाऱ्या गावातील दिव्यांग लोकांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले सदर मेळाव्यात पोमके येरकड हद्दीतील 25 दिव्यांग नागरिक उपस्थित होते सदर मेळाव्याचे मेळाव्यात पाच दिव्यांगाना गरजेनुसार विविध साहित्य वाटप करण्यात आले.
सदर मेळाव्यात दिव्यांगाच्या 50 मीटर धावणे रस्सीखेच व संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेत भाग घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले तसेच पोलीस दल गडचिरोली तर्फे आगामी काळात गडचिरोली येथे दिव्यांग महा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सर्वांनी याची माहिती देण्यात आली सदर कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक आकाश ठाकरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी यांनी दिव्यांगासाठी शासनाद्वारे सुरू असलेल्या विविध उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेव उसेंडी सरपंच ग्रामपंचायत येरकडं तर प्रमुख पाहुणे म्हणून जयंत मेश्राम ग्रामसेवक ग्रामपंचायत येरकडं प्रकाश मारबते अध्यक्ष दिव्यांग संघटना धानोरा अतुल शिंपी येरकड इत्यादी प्रमुख पाहुणे या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आकाश ठाकरे पोलीस उपनिरीक्षक येरकड यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालक अरुण आघाव नापोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन कैलास माळी यांनी मानले सदर कार्यक्रमास जिल्हा पोलीस अंमलदार तसेच पोलीस उपनिरीक्षक भागवत एस आर पी एफ अंमलदार तसेच पोलीस मदत केंद्र येरकड मधील सर्व पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले.