चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली:- रा.प. साकोली जिल्हा भंडारा आगार येथे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दरवर्षी सुरक्षितता मोहीम राबवित येतो, आज २५/१/२३ ला इंधन बचन मासिक कार्यक्रम सन-२०२३ व “सुरक्षितता अभियान” समारोपन कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी अध्यक्ष मनुन श्रि गौतमजी शेंडे आगार प्रमुख , अतिथी मनुन डॉ हेमकृष्ण कापगते माजी आमदार तथा मानसेवी वैद्यकिय अधिकारी, तसेच कार्यक्रमाचे मुख्यमार्गदर्शक श्री. घनश्याम निखाडे प्राचार्य करंजेकर पॉलिटेक्निक साकोली , कु· माधुरी साखरवाडे,श्री. उमेश उईके, वा.नि. हे उपस्थित होते ,श्री. घनश्याम निखाडे यांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये अपघाताची कारणं शोधून उपाययोजनांसाठी विविध शिबिरं घ्यावी व प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी, वाहतुकीच्या नियमाचं पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मानसिक आरोग्य’ या चतुःसुत्रीचं पालन करत एसटीच्या चालकांनी यंदाच्या वर्षांमध्ये सामान्य जनतेला अपघात-विरहित सेवा द्यावे असे आवाहन केले त्याचबरोबर डॉ हेमकृष्ण कापगते यांनी चालकांसाठी प्रबोधन, प्रशिक्षण,आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी,गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती व्यायला पाहिजे असे सांगितले. श्रि गौतमजी शेंडे आगार प्रमुख यांनी अध्यक्षीय भाषणात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सूचना दिला वाहन हळु चालविणे, वाहन ओव्हरटेक करू नये, मोबाइल वर बोलू नये असे सांगितले
कार्यक्रमाला पर्यवेक्षक, यांत्रिक कर्मचारी, चालक, वाहक कर्मचारी उपस्थित होते.