अखेर अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेचा उपोषण सहा दिवसा नंतर समाप्त… — अप्पर जिल्हाधिकारी यांच्या भेटीनंतर समाप्त 30 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक…

      सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

          अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद जिल्हा चंद्रपूर शाखा सावली तालुका या संघटनेच्या वतीने 19/12/2024, पासून सावली तालुक्यातील तहसील कार्यालय समोर आदिवासी समाज बांधव यांच्या विविध मागण्या घेऊन जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते.

            या उपोषणातील अनेक महत्वाच्या मागण्या प्रकल्प अधिकारी चंद्रपूर, वनविभाग सावली, तहसील कार्यालय सावली, पंचायत समिती सावली तर काही मागण्या जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या अंतर्गत होत्या त्या अनुषंगाने त्या त्या विभागाने आपल्या परीने उपोषण मंडपाला भेट देऊन मागण्या मान्य केल्या व आश्वासन दिले.

          सावली तालुक्यातील आजपर्यंतच्या इतिहासात सहा दिवस चालणारे पहिले आमरण उपोषण असून सर्वांचे लक्ष वेधले गेले सावली तालुक्यातील आदिवासी समाज बांधव यांच्या आमरण उपोषणाला अनेक आदिवासी संघटना, पदाधिकारी, उपस्थित राहून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठींबा दिला सर्व समाज बांधव एकजुटीने सहकार्य केले.

            उपोषण सहा दिवस झाले असताना 24/12/2024ला 6:30 वाजता चौधरी अप्पर जिल्हाअधीकारी चंद्रपूर, चरडे sdo मुल, तहीलदार सावली प्रांजली चीरडे मॅडम यांनी जिल्हाधकाऱ्यांमार्फत, प्रकल्प अधिकारी चंद्रपूर कार्यालय यांनी मुद्देसूद विविध मागण्या व त्या अनुषंगाने ते ते विभाग पुरता करण्याचे आश्वासन जिल्हाधकाऱ्यांमार्फत सुद्धा दिले.

          उपोषण कर्त्या सोबत तास भर चर्चा करून जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे संपूर्ण विभागालाच्या मुख्य अधिकारी यांची बैठक उपोषण करणारे अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद शिस्टमंडळ यांना बोलावून 30/12/2024 ला जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे घेण्यात येईल असे लेखी अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर,sdo, तहसीलदार यांनी पत्र स्व स्वाक्षरीने उपस्थित आदिवासी आमरण उपोषण करणाऱ्या संघटनेला लिहून दिले व मागण्या मान्य करून उपोषण सोडविण्यात आले.

          यावेळी उपोषण स्थळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे वरिष्ठ पदाधिकारी घनशाम जी मडावी साहेब, विठल गेडाम साहेब,प्रमोद बोरीकर, कृष्णा मसराम, गो ग पार्टी बापू मडावी,अतुल कोडापे जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी युवा विकास परिषद, सावली तालुका अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद प्रविण गेडाम, उपाध्यक्ष उत्तम गेडाम, सचिव अशोक कनाके, पुरणबापू मडावी, रमेश कनाके, युवराज उईके, भास्कर गेडाम, रमेश कनाके, यात्रिका कुमरे, शारदा उईके ,किरण गावळे, अनिकेत शेडमाके आदी पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        उपोषण करणाऱ्या पदाधिकार्याची तब्येत चिंताजनक झाल्यानंतर प्रशासन गंभीर झाले व शेवटी उपोषण कर्त्याना नींबु पाणी, ज्यूस देऊन अधिकारी यांनी उपोषण सोडविले त्यामुळे उपोषण कर्त्याना देण्यात आलेल्या अधिकाऱ्याच्या आश्वासनाची पूर्तता कितपत होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.