केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांचा निषेध तर परभणी प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची चिमूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची निवेदनाद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना मागणी…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

            केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी दिनांक १७ डिसेंबर २०२४ ला राज्यसभेत युगप्रवर्तक,जगप्रसिद्ध प्रकांड पंडित तथा जगमान्य थोर समाजसुधारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अनुचित असे उपोरोक्त वक्तव्य करून जाणिवपूर्वक अपमान केला आणि देशात तेढ निर्माण करण्याची भुमिका घेतली असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे त्यांचा निषेध केला.

        तर परभणी प्रकरण हे सुनियोजित असल्याची शंका चंद्रपूर व चिमूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आहे.

       कारण परभणी येथील संविधान शिल्प विटंबनेचा आरोपी मनोरुग्ण दाखविण्यात आला आहे.मनोरुग्ण आरोपी हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या हातातील संविधान शिल्पाची विटंबना करतोय,अशा पध्दतीची माहिती हिवाळी अधिवेशनातंर्गत विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.सद माहिती अंतर्गत मुद्दाच शंका घेण्यास पुरेसा ठरतो आहे.

           तद्वतच परभणी संविधान शिल्प विटंबनेच्या प्रकरणातंर्गत काॅम्बिंग आप्रेशनच्या नावावर निर्दोष व्यक्तींना,आया बहिणींना घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली व त्यांना आरोपी करण्यात आले आहे.हा प्रकारच प्रशासना द्वारे सुनियोजित अत्याचार व अन्याय करणारा आहे दिसतो आहे. 

         म्हणूनच शासकीय-प्रशासकीय यंत्रणेचे जे घटनात्मक पदाधिकारी आणि अधिकारी व इतर दोषी आहेत त्यांचा केंद्रीय तपास यंत्रणा द्वारे शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

*****

सादर निवेदन खालील प्रमाणे जैसे थे..‌.

प्रती,

मा.ना.नरेंद्रजी मोदी साहेब, प्रधानमंत्री भारत सरकार,नवी दिल्ली.‌.

विषय:- 

     १) जिल्हा परभणी येथील दिनांक १० डिसेंबर २०२४ व दिनांक ११ डिसेंबर २०२४ ला घडलेल्या प्रकाराबाबत चौकशी करुन दोषी व्यक्तींवर कायदेशीररित्या कारवाई करण्याबाबत.

     २) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या अमित शहा (गृहमंत्री भारत सरकार) यांचा निषेध करीत असल्याबाबत.

मार्फत :-

     मा.अप्पर जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,कार्यालय चिमुर,जि. चंद्रपूर

महोदय,

     उपरोक्त विषयान्वये वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा चिमुरच्या वतीने खालील बाबीची शासन आणि प्रशासन यांनी सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीवर कठोरातील कठोर कार्यवाही करण्याबाबत निवेदन देण्यात येत आहे.करिता पुढील कार्यवाहीसाठी निवेदन सादर.

***

मुद्दा क्र. १ :

     जिल्हा परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ महानगर पालिकेने चौकीदाराची डयुटी का लावण्यात आली नाही ? या संबंधीत अधिकाऱ्यावर प्रथमतः कार्यवाही करावी.

*****

मुद्दा क्र. २:

      जिल्हा परभणी येथील दिनांक १० डिसेंबर २०२४ ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यावर असणाऱ्या संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्या पवार नावाच्या व्यक्तीवर कोणती कार्यवाही केली ही प्रशासन व शासनाने जाहीर करावे व अशा अंधभक्त व्देष भावनेने कृत्य करणाऱ्या व समाज भावना भंडकविणाऱ्या व्यक्तीला सजा देण्यात यावी.

*****

मुद्दा क्र. ३ :

      जिल्हा परभणी येथील दिनांक ११ डिसेंबर २०२४ ला संविधान शिल्पाच्या तोडफोड प्रकरणी संविधान प्रेमी यांनी बंदची हाक दिली होती.त्यामुळे पोलीस प्रशासनाने सज्ज राहुन आपली जबाबदारी पुर्ण पार पाडणे आवश्यक होते.परंतु पोलीस प्रशासनाने आपली भुमिका योग्य रितीने पार न पाडल्यामुळे दंगल उसळली. याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. सर्व शांततेत पार पडल्यानंतर अचानक दंगल पेटणे हे कृत्य संविधान प्रेमी यांनी केले नसुन जे लोक संविधान विरोधी आहेत त्यांनी केले आहे. त्यांनी सदर प्रकरण घडवुन आणले आहे. 

        मात्र आंबेडकर अनुयायांना दोषी धरून रात्री-बेरात्री आंबेडकरी समाजाच्या वस्त्यांवर पोलीसांनी हल्ला करून विनाकारण बौध्द लोकांना बेदम मारहाण केली आहे.याचा आम्ही निषेध करतो. 

        संबंधीत पोलीसांवर,अधिकाऱ्यांवर शासनाने कार्यवाही करून त्यांना निलंबीत करावे व त्यांची सखोल चौकशी करावी.

*****

मुद्दा क्र. ४ :

        परभणी येथील दिनांक ११ डिसेंबर २०२४ ला दंगली प्रकरणी सोमनाथ सुर्यवंशी यांना अटक करुन पोलीसांनी पोलीस कस्टडीमध्ये बेदम मारहाण केली व नंतर कारागृहात डांबले. तया कारागृहामध्ये त्याचा मृत्यु झाला. हि घटना न्यायालयीन कस्टडीतील असल्यामुळे त्याची सखोल चौकशी करून संबंधीत पोलीस व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबीत करुन त्यांचेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.

      सोमनाथ सुर्यवंशी कायद्याचा विद्यार्थी असुन त्याचा प्रत्यक्ष दंगलीत कोणताही हस्तक्षेप नव्हता.तरीही त्याला कोंबींग ऑपरेशनच्या नावाखाली अटक करून व्देष बुध्दीने अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्या अमानुष मारहाणीमुळे त्याचा मृत्यु झाला.

      यामुळे त्याच्या कुटुंबावरती फार मोठा आघात झाला असुन शासनाने त्यांच्या कुटुंबियांना एक करोड आर्थिक मदत द्यावी व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावुन घेणे आवश्यक आहे.अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन करण्यात येते.

*****

मुद्दा क्र. ५ :

    भारतीय संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असतांना मा. अमित शहा,गृहमंत्री भारत सरकार यांनी संसदेमध्ये आपले मत मांडत असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून असे म्हटले की,”आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर!…. यह बार बार कहना ये फॅशन हो गयी है, अगर इतने बार भगवान का नाम लेते तो आपको सात जन्म तक स्वर्ग मिला होता !” अशाप्रकारचे कुच्छीत भावनेतून व्देषाने असे वक्तव्य केले. हे त्यांचे वक्तव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे असुन त्याबद्दल वंचित बहुजन आघाडी तिव्र निषेध करते. 

       तसेच महामहीम राष्ट्रपती महोदया यांना विनंती करते की,मा.अमित शहा यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा मागुन त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी आमची मागणी आहे.

          वरिलप्रमाणे मुद्दा क्र. १ ते ५ व्दारे प्राप्त परिस्थिती विषद केलेली आहे.त्या परिस्थितीला गांभीर्याने विचारात घेवुन महाराष्ट्र शासन,परभणी जिल्हा पोलीस प्रशासन व भारतरत्न,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या मा.अमित शहा यांचा वंचित बहुजन आघाडीत तिव्र निषेध करते.

       एकीकडे बांग्लादेशात राहणाऱ्या हिंदु लोकांना संरक्षण देण्यासाठी मोर्चे काढले जाते.परंतु भारतात राहणाऱ्या हिंदु लोकांवर,बौध्द लोकांवर हल्ले करून त्यांना देशोधडीला लावले जाते.ही शासनाची कुटनिती आहे.यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. तसेच इव्हीएमव्दारे जिंकणाऱ्या सरकारला आपले पाप लपविण्यासाठी अशा प्रकारचे हल्ले करून लोकांना विचलीत करणे व इव्हीएमसंबंधी आवाज बंद करणे,या उद्देशाने राज्यकर्त्यांनी जाणीवपुर्वक वरिलप्रमाणे घडलेले प्रकार आहेत असे आम्हाला वाटते.

         त्यामुळे या सर्व बाबिंचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र निषेध करण्यात येत आहे. करिता निवेदन पुढील कार्यवाहीस्तव सादर.

चिमुर.‌‌..‌

दिनांक: २४/१२/२०२४…

               आपले निवेदक..‌

वंचित बहुजन आघाडी तालुका पदाधिकारी चिमुर,जि.चंद्रपुर…

****

             प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे चिमूर यांच्या मार्फत निवेदन सादर करताना चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.बाळासाहेब बन्सोड,चिमूर तालुका सरचिटणीस लालाजी मेश्राम,चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष स्नेहदिप खोब्रागडे,जनार्दन खोब्रागडे,सिध्दार्थ चहांदे,रामदास राऊत, यशवंत म्हैसकर,शालीक थुल,नारायण कांबळे,मनोहर वाळके,विनोद येसांबरे,संदीप मेश्राम,लालाजी शेंडे,हरिश्चंद्र पाटील बोरगाव,आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.