मी कोण? प्रत्येक भारतीय नागरिकच नव्हे तर जगाचा नागरिक…. — भाग = ३ 

         प्रत्येक नागरिकांनी आपल्यातील धार्मिक कट्टरता थोडीशी कमी करुन एक पाऊल मानवता धर्माच्या दिशेने जर टाकले.तर आपोआपचा मानवता धर्माचा उत्कर्ष अर्थात संविधानाची जागृती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जसजसे आपण एक एक पाऊल पुढे टाकू तसतसे आपण आपल्याही धर्माच्या शुद्ध आचरणाकडे गेल्याशिवाय राहणार नाही.ही काळ्या पाषाणावरील कोरीव सुवर्ण रेष आहे…

         आणि हा दृढसंकल्प आज मनुस्मृती दहन दिनानिमित्त ( 25/12/2024 ) प्रत्येक भारतीयांनी घ्यावा.

कारण….

       ज्या मनू ऋषीने ही मनुस्मृतीच्या धार्मिक कायद्याची निर्मिती केली. ज्या कायद्याने त्या मनूला जन्म देणाऱ्या आईला सुद्धा म्हणजे प्रत्येक ” स्त्री “ला अतिशूद्र म्हणून हिनविले.

           जी आमची माता,आजी, बहीण,मावशी,अर्धांगिनी,सूपुत्री असेल,तीला या मनुस्मृतीने ब्राम्हण,क्षत्रिय,वैश,शूद्र या चार वर्णाच्याही खालचा स्तर “अतिशूद्र ” असलेला स्तर या मनूने स्त्रीला दिला.

म्हणूनच…..

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी याच धार्मिक कायदा असलेल्या मनुस्मृतीची जाहीर होळी केली!

       हा एक मानवमुक्ती आणि स्त्रीमुक्तीचा ऐतिहासिक दिवस आहे.

           एकंदरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनातील असे जे जे क्रांतिकारक निर्णय घेऊन या देशात समानता आणि मानवता प्रस्थापित करण्यासाठी जी जी क्रांती केली.त्या त्या क्रांत्या येथील ब्राम्हणशाहीने केवळ विरोधच करुन थांबले नाहीत. तर हा विरोध त्यांनी बहुजन ओबीसी बांधवात पेरण्यात यशस्वी झाले म्हणून या समाजाची दृष्टी बाबासाहेबांना एक क्रांतिकारक किंवा माणूस म्हणून न पाहता एक तुच्छतेने पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण झाला.म्हणून या बहुजन ओबोसी समाजाने या ब्राम्हणवाद्याच्या नजरेचा चष्मा काढून जर एक माणूस म्हणून या युगपुरुषाकडे बघितले, तर निश्चितच अमेरिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना…

      “THE SYMBOL OF KNOWLEDGE OF WORLD,का संबोधले याचा अर्थ निश्चितच समजल्याशिवाय राहणार नाही.

       भारताच्या संविधानात एवढी अफाट शक्ती आहे की ती भारताच्याच नव्हे तर जगाच्या समस्या सोडविण्याची क्षमता तिच्यात आहे….

         उदाहरणच घ्यायचे असेल तर,अमेरिकेत ज्या कारणामुळे महापुरुष अब्राहम लिंकन आणि मार्टिन ल्यूथर किंग यांची हत्या झाली.पुढे यांच्या हत्येच्या कारणाला नष्ट करण्यासाठी अमेरिकेला कायदा करावा लागला. तोच कायदा ” वर्णा ” वरून भेद करता येणार नाही.हा संविधानिक कायदा बाबासाहेबांनी निर्माण केला.

              जगात प्राचीन काळापासून अल्पसंख्यांक विरुद्ध बहुसंख्यांक यांच्यामधील टोकाच्या मतभेदामुळे मानवी हक्कासाठी रक्तरंजित पाट वाहिले.त्या अल्पसंख्यांकांना सुद्धा लोकशाहीत महत्वाचे स्थान बरोबरीने आहे हे त्यांनी संविधानातील मार्गदर्शक तत्वातून दाखवून दिले.म्हणजे जगात कुठेही रक्तपात होऊ नये याची दक्षता सुद्धा….

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली आहे……

        अशा युगपुरुषाचे नाव आंबेडकर… आंबेडकर…. आंबेडकर…. आंबेडकर… आंबेडकर… ले रहे हो, इतना नाम अगर आप भगवान का लेते तो,सात जनम तक स्वर्गमे जगह मिल जाती. “

               —– अमित शहा ( एक तडीपार,एक खुनी आणि EVM मोदी सरकारचा दुर्दैवाने केंद्रीय गृहमंत्री आहे )

           तेंव्हा प्रत्येक भारतीय नागरिकांने आपल्याला संविधानाने प्रदान केलेल्या मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी झगडणे हेच प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे.

आवाहनकर्ता,जागृतीचा कृतिशील लेखक

           अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689..

(याच्या या बेअक्कल वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो.‌)