अंकिता पाटील ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे ७ वी खुली राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, पुणे जिल्हा अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त ७ वी खुली राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा शुक्रवार दि. २२ डिसेंबर ते रविवार २४ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यातील निगडी येथील मिनाताई ठाकरे स्केटींग हॉल येथे पार पडली.

         या स्पर्धेमध्ये पुणे, इंदापूर, बारामती, शिरूर, अहमदनगर, मुंबई, ठाणे, सोलापूर, चाकण येथील सुमारे ३॰० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येक खेळाडुस स्पोर्ट बॅग गिफ्ट देण्यात आली.

          स्पर्धेमधील विजेत्या खेळाडुंचे व आयोजकांचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील व अंकिता पाटील ठाकरे यांनी अभिनंदन केले.

        स्पर्धेचे आयोजन पवनराजे घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल घोगरे, मुनावर शेख व गणेश पवार यांनी केले.

         स्पर्धेसाठी भारतीय जनता पार्टी, पुणे शहर चे माजी सरचिटणिस संदिप लोणकर, उद्योजक राहुल पिंगळे, विजय निंबाळकर, सुरेश फडके, ज्ञानदेव घोगरे, ईश्वर घोगरे, बाळासाहेब दिवेकर,शहाजी घोगरे, अमोल तांबे, सुमित भुजबळ, सलिम शेख, विजय शेलार उपस्थित होते.