संतांच्या संगतीत राहुन् परमार्थाची गोडी लागतच असते. परंतु माझ्या गुरुवर्याची सेवा माझ्या हातून घडली याचा सार्थ स्वाभिमान मी बाळगतो:- ह भ प राम महाराज आभंग… — अखंड हरिनाम सप्ताह निमित्त पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा ह भ प राम महाराज आभंग वडापुरी यांची झाली.

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

           पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे सालाबाद प्रमाणे श्री गुरु दत्त जयंती निमित्त ग्रामस्थ व भाविक भक्त यांच्या सौजन्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे तिसऱ्या वर्षाचे आयोजन करण्यात आले आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान आकरावे वंशज श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर मळवली यांच्या मार्ग दर्शनाने व श्री गुरु सोहम महाराज देहुकर यांच्या नेतृत्वाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

            पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा ह भ प राम महाराज आभंग वडापुरी यांची झाली. तर त्याच दिवशी संध्याकाळी भोजन व्यवस्था, अन्नदाते,शिवाजी आण्णासाहेब बोडके ,माजी सरपंच श्रीकांत शिवाजी बोडके, पोपट शिवाजी बोडके यांच्या वतीने देण्यात आली.

            तसेच संपूर्ण सप्ताहासाठी आठ दिवस सकाळी चहाची व्यवस्था आबासाहेब गजानन बोडके यांच्या वतीने देण्यात येत आहे.तर दररोज सकाळी आठ दिवस अल्पो आहारची व्यवस्था शरद विठ्ठल बोडके यांची असते.आठ दिवस फुल आणि हार व्यवस्था नबेलाल शाबुधीन शेख यांची असते.आठ दिवस शुद्ध पाणी व्यवस्था तेजस एक्वा यांची असते.मंडप स्पीकर व्यवस्था विठ्ठल साऊंड सर्विस गणेशवाडी विठ्ठल गायकवाड यांची आहे, सप्ताहासाठी संपूर्ण आचारी सेवा ह भ प शिंदे बुवा बिजवडी यांची चालु आहे.

           गेली तीन वर्षा पासून सप्ताहाचे नियोजन करण्याचे प्रयत्न व गाव पातळीवरील सर्वच पिंपरी ग्रामस्थ व कार्यकर्ते मिळून एकत्र बैठक करून सप्ताहाचे आयोजन करण्याची भूमिका ह भ प महेश सुतार महाराज यांनी केली. याबद्दल सर्वच भाविक व ग्रामस्थांकडून महेश सुतार यांचे कौतुक होऊ लागले.

             हरिजागर व नामाचा जयघोष करून भरगच्च कार्यक्रमाने सप्ताहाची तिसऱ्या दिवसाची सेवा झाली. सप्ताहासाठी, समस्त ग्रामस्थ पिंपरी बुद्रुक आजी, माजी ,सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व वारकरी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने दररोज येत आहेत.

              आनंदाने महाभोजन घेऊन आनंद घेत आहेत. सर्व भागातील भाविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने नामाचा रस घेण्यासाठी हजारोच्या संख्येने दररोज उपस्थित राहात आहेत.

           अखंड हरिनाम सप्ताहाचे संपूर्ण नियोजन, आयोजन हे पिंपरी बुद्रुक येथील सर्वच ग्रामस्थ व भाविक भक्त करीत आहेत आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचेलन ह भ प महेश महाराज सुतार हे करीत आहेत.

चौकट

          प्रत्येक वर्षी सालाबाद प्रमाणे पिंपरी बुद्रुक येथील सर्व ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहासाठी मोठ्या प्रमाणात आन्नदान सेवा करण्यात येत आहे.